सांगली - सांगली शहरासह आसपासच्या वातावरणात अचानक बदल झाला आहे. तुरळक पावसाबरोबर सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण होऊन गारठा पडला आहे. त्यामुळे, सांगली शहराला हुडहुडी भरली आहे. तर, या कडाक्याच्या थंडीमुळे शहरातील जनजीवनावर परिणाम झाला आहे.
ढगाळ वातावरणाने शहर गारठले..
काल रात्रीपासून जोरदार वारे सुटले होते आणि आज सकाळपासून वातावरणात पूर्ण बदल झाला आहे. सकाळपासून संपूर्ण शहरात ढगाळ वातावरण आणि गारठा निर्माण झाला आहे. दुपारपर्यत हे ढगाळ वातावरण कायम होते. सगळीकडे पडलेल्या या थंडीचे परिणाम जनजीवनावर मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळाले. नेहमीची वर्दळ रस्त्यावर दिसून आली नाही.
20 डिग्री पर्यंत पोहोचले तापमान..
थंडी सुरू होऊन 1 महिना उलटला तरीही थंडीचा फारसा प्रभाव नव्हता. तापमान हे साधारण होते. मात्र, आज निर्माण झालेले ढगाळ वातावरण आणि गारठा यामुळे तापमान 20 डिग्री अंशवार आले. त्यामुळे पुढे थंडी आणखी वाढेल, असे सांगलीकरांना वाटत आहे.
तुरळक पावसाचीही हजेरी..
काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत जिल्ह्यातील काही भागात तुरळक पाऊस पडला आहे. तसेच, थंड वारे वाहू लागले आहे. त्यामुळे, अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा - किड्यांच्या थव्यात काळजाचा ठोका चुकवणार अपघात कॅमेरात कैद..!