ETV Bharat / state

कर भरा अन् सोन्याचे दागिने बक्षीस मिळावा, 'या' गावात राबवली जाते योजना

कर भरा आणि सोन्याची दागिने बक्षीस मिळवा, अशी भन्नाट योजना सांगलीच्या वांगी ग्रामपंचायतीने सुरू केली आहे. या हटके योजनेची गावच्या पारा पासून पंचक्रोशीत जोरदार चर्चा सुरू आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Dec 23, 2019, 10:38 PM IST

सांगली - कर भरा आणि सोन्याची दागिने बक्षीस मिळवा, अशी भन्नाट योजना सांगलीच्या वांगी ग्रामपंचायतीने सुरू केली आहे. 100 टक्के करवसुलीसाठी ग्रामपंचायतीने ही शक्कल लढवली असून 'करवसुली सुवर्ण बक्षीस योजना'असे याचे नाव आहे. आता या योजनेतून करदात्याला सोन्याची अंगठय़ा आणि कॉईन मिळणार आहे.

कोणताही कर वसूल करायचा म्हटले की ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका या संस्थांसमोर मोठे आव्हान असते. करबुडव्यांमुळे दरवर्षी थकीत प्रमाण वाढत असते. खरंतर या कराच्या माध्यमातून त्या गावांचा आणि शहरांचा विकास अवलंबून असतो. पण, 100 टक्के कर वसुली होत नसल्याने त्याचा विकासावर परिणाम झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. अनेक वेळा कर वसुलीसाठी व्याज, दंड माफ अशा सवलतीच्या योजना सुरू केल्या जातात. पण, त्याचा फारसा फायदा होत नाही. मात्र, सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील वांगी या ग्रामपंचायतीने यंदाच्या आर्थिक वर्षी 100 टक्के कर वसुलीसाठी करवसुली सुवर्ण बक्षीस योजनाही अफलातून आणि हटके योजना जाहीर केली आहे.

वांगी हे कडेगाव तालुक्यातील एक मोठे गाव असून त्याची लोकसंख्या ही नऊ हजारांच्या आसपास आहे. यामुळे गावच्या कराचा आकडा देखील मोठा आहे. गावची दरवर्षी एकूण 65 लाखांच्या आसपास ग्रामपंचायतींची करवसुली असते. गावात एकूण 2 हजार 600 मिळकतदार आहेत. पण, अनेकजण थकबाकी भरत नाही. जे कर भरत नाहीत, त्यांचे नळ कनेक्शन तोडणे, गाळे सील करणे, असे अनेक उपाय करूनही गावाची कर वसुली ही केवळ 30 टक्केच होते. याचा परिणाम गावाच्या विकासावर होतो.

त्यामुळे, वांगी ग्रामपंचायतीने यंदा कर वसुलीसाठी कोणत्याही प्रकारची जबरदस्ती न करता स्वखुशीने 100 टक्के कर कसा होईल, याचा विचार करत. कर वसुलीसाठी काही वेगळी योजना सुरू करता येईल का ? या विचारातून करवसुली सुवर्ण बक्षीस योजना ही अंमलात आली आहे. महिलांना दागिन्यांचे मोठे आकर्षण असते आणि नेमकी हीच गोष्ट हेरून ग्रामपंचायतीने ही योजना आखली आहे. जे घरपट्टी, पाणीपट्टी भरतील त्यांचा या योजनेत समावेश होणार आहे.
या योजनेमध्ये प्रथम, द्वितीय, आणि तृतीय अशी तीन बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. पहिले बक्षीस पाच ग्रॅम सोन्याची अंगठी, दुसरे बक्षीस तीन ग्रॅम सोन्याची अंगठी आणि तृतीय बक्षीस दोन ग्रॅम सोन्याचे नाणे, असे बक्षिस असणार आहेत. मार्च, 2020 मध्ये या योजनेची लकी ड्रा पद्धतीने सोडत होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य व कर्मचारी या योजनेत भाग घेता येणार नाही, त्यामुळे घोटाळाचा विषय राहणार नाही.

हेही वाचा - चांदोली-मुंबई मार्गावर 'बर्निंग बस'चा थरार

ग्रामपंचयायतने राबवलेल्या या हटके योजनेची गावच्या पारा पासून पंचक्रोशीत जोरदार चर्चा सुरू आहे. तर आता या सोन्याच्या अंगठीच्या हव्यासापोटी तरी सगळे गावकरी आपला कर भरतील आणि गावच्या विकासाला हातभार लावतील अशी अपेक्षा वांगी ग्रामपंचायतीकडून व्यक्त होत आहे.

हेही वाचा - एनआरसी विरोधात एनएसयुआयचा सांगलीत मशाल मोर्चा

Intro:
File name - mh_sng_01_tax_yojna_vis_01_7203751 - to - mh_sng_01_tax_yojna_byt_07_7203751

स्लग - कर भरा आणि सोन्याची दागिने बक्षीस मिळावा,वांगी ग्रामपंचायतीची हटके योजना...

अँकर - कर भरा आणि सोन्याची दागिने बक्षीस मिळावा,अशी भन्नाट स्पर्धा सांगलीच्या वांगी ग्रामपंचायतीने सुरू केली आहे.100 टक्के करवसुलीसाठी ग्रामपंचायतीने ही शक्कल लढवली असून 'करवसुली सुवर्ण बक्षीस योजना'असे याचे नाव आहे.आता या योजनेतून करदात्याला सोन्याची अंगठी आणि कॉईन मिळणार आहे.Body:कोणताही कर वसूल करायचा म्हटलं की ग्रामपंचायत ,नगरपालिका आणि महानगरपालिका या संस्थां समोर मोठे आव्हान असते,आणि मार्च महिना जवळ आला की,या स्थानिक स्वराज्य संस्थांची पुरती दमछाक होते.आणि दरवर्षी थकीत प्रमाण वाढत असते,खरंतर या कराच्या माध्यमातून त्या गावांचा आणि शहरांचा विकास अवलंबून असतो,पण 100 टक्के कर वसुली होत,नसल्याने त्याचा विकासावर परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते.अनेक वेळा कर वसुलीसाठी व्याज,दंड माफ अश्या सवलतीच्या योजना सुरू केल्या जातात, पण त्याचा फारसा फायदा होत नाही. मात्र सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील वांगी या ग्रामपंचायतीने यंदाच्या आर्थिक वर्षी 100 टक्के कर वसुलीसाठी एक अफलातून आणि हटके योजना जाहीर केली आहे.
100 टक्के घरपट्टी,पाणीपट्टी आणि इतर थकीत कर भरा आणि सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळावा अशी योजना सुरू केली आहे.

'वांगी' हे कडेगाव तालुक्यातील एक मोठे गाव असून त्याची लोकसंख्या ही 9 हजारच्या आसपास आहे.आणि मोठं गाव असल्याने गावच्या कराचा आकडा देखील मोठा आहे.गावची दरवर्षी एकूण 65 लाखाच्या आसपास करवसुली असते,
गावात एकूण 2600 खातेदार आहेत.पण प्रत्येकजण थकबाकी भरत नाही,तर जे कर भरत नाहीत,त्यांचे नळ कनेक्शन तोडने,गाळे सील करणे,असे अनेक उपाय करूनही गावाची कर वसुली ही केवळ 30 टक्केच होते.परिणामी गावाच्या विकासावर हा परिणाम हा ठरलेले आहे.
त्यामुळे वांगी ग्रामपंचायतीने यंदा कर वसुलीसाठी कोणत्याही प्रकारची जबरदस्ती न करता स्वखुशीने 100 टक्के कर कसा होईल,याचा विचार करत.कर वसुलीसाठी काही वेगळी योजना सुरू करता येईल का ? या विचारातुन
करवसुली सुवर्ण बक्षीस योजना ही अंमलात आली आहे.महिलांना दागिन्यांचे मोठे आकर्षण असते,आणि नेमकी हीच गोष्ट हेरून घरच्या कारभारनीला खुश करण्यासाठी ग्रामपंचायतीने ही योजना आखली आहे.जे घरपट्टी, पाणीपट्टी भरतील त्याचा या योजनेत समावेश होणार आहे. कर वसुली प्रोत्साहनपर बक्षीस योजना" या नावाने ही बक्षीस योजना राबवली जाणार आहे.या योजनेमध्ये प्रथम , द्वितीय , तृतीय अशी एकूण तीन बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. पाहिले बक्षीस पाच ग्रॅम सोन्याची अंगठी, तर दुसरे बक्षीस तीन ग्रॅम सोन्याची अंगठी आणि तृतीय बक्षीस दोन ग्रॅम सोन्याची अंगठी असे बक्षिस असणार आहेत.मार्च 2020 मध्ये या योजनेची लकी ड्रा पध्दतीने सोडत होणार आहे.महत्वाची बाब म्हणजे ग्रामपंचायतीचे सरपंच ,सदस्य व कर्मचारी या योजनेत भाग घेता येणार नाही ,त्यामुळे घोटाळाचा विषय राहणार नाही.

बाईट-: डॉ. विजय होनमाने, सरपंच, वांगी,कडेगाव,सांगली.

बाईट - वैशाली कुलकर्णी - ग्रामस्थ ,वांगी,कडेगाव ,सांगली.

बाईट - राजाराम मोहिते - ग्रामस्थ ,वांगी,कडेगाव ,सांगली.
Conclusion:ग्रामपंचयायतने राबवलेल्या या हटके योजनेची गावच्या पारा पासून पंचक्रोशीत जोरदार चर्चा सुरू आहे.
तर आता या सोन्याच्या अंगठीच्या हव्यासापोटी तरी सगळे गावकरी आपला कर भरतील आणि गावच्या विकासाला हातभार लावतील अशी अपेक्षा वांगी ग्रामपंचायतीकडून व्यक्त होत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.