ETV Bharat / state

Organized Shaheed Daud : 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, 'शहीद दौड'चे आयोजन - शहीद दौडचे आयोजन

26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विरांना श्रद्धांजली (they will be tribute to 26 Nov shaheed sainik) वाहण्यासाठी, आज सांगलीतून 'शहीद दौड' मुंबईच्या दिशेने (organized shaheed daud from sangali) रवाना झाली आहे. त्यामध्ये शेकडो सांगलीकरांनी सहभाग घेतला, त्याचबरोबर या शहीद दौड प्रसंगी विविध साहसी खेळ सादर करण्यात आले.

Organized Shaheed Daud
शहीद दौडचे आयोजन
author img

By

Published : Nov 22, 2022, 2:21 PM IST

सांगली : 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विरांना श्रद्धांजली (they will be tribute to 26 Nov shaheed sainik) वाहण्यासाठी, आज सांगलीतून 'शहीद दौड' (organized shaheed daud from sangali) मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे. 470 किलोमीटरच्या शहीद दौडीत 22 धावपटू सहभागी झाले आहेत. या धावपटूंना शुभेच्छा देण्यासाठी सांगली शहरातील शहीद दौड पार पडली. त्यामध्ये शेकडो सांगलीकरांनी सहभाग घेतला, त्याचबरोबर या शहीद दौड प्रसंगी विविध साहसी खेळ सादर करण्यात आले.

470 किलोमीटरची दौड : सांगलीतील शहीद अशोक कामटे स्मृती फौंडेशन, तसेच सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 'शहीद दौड' मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्ताने सांगली ते मुंबई 470 किलोमीटरची 'शहीद दौड' आयोजित करण्यात आली.

प्रतिक्रिया देतांना सहभागी व्यक्ती

सांगलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते शहिद दौडचा शुभारंभ झेंडा दाखवून करण्यात आला. या प्रसंगी उपायुक्त राहुल रोकडे यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होते. विश्रामबाग येथील शहीद अशोक कामटे स्मृती चौकातून ही शहीद दौड सुरू झाली. यामध्ये विविध शाळा, क्रीडा संस्था तसेच नामवंत धावपटू यांनी सहभाग घेतला. यावेळी पहिल्यांदा राममंदिर पर्यंत अडीच किलोमीटर पर्यंत दौड काढण्यात आली. ज्याला सांगलीकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.

25 नोव्हें ला मुंबईत दाखल : या मॅरेथॉनच्या निमित्ताने शहिदांना मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया (gate way of india) येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी, सांगली ते मुंबई शहीद दौडचा शुभारंभ झाला. त्यामध्ये 22 धावपटूंनी सहभाग घेतला होता आणि शहीद दौडच्या माध्यमातून सुरू झालेल्या, या सांगली ते मुंबई दौड रॅली दरम्यान शुभेच्छा आणि प्रोत्साहन देण्यासाठी विविध मर्दानी खेळ सादर करण्यात आले होते. त्यामध्ये सादर केलेल्या दांडपट्टा प्रात्यक्षिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या शहीद दौडीत 22 धावपटू 470 किलोमीटरचा प्रवास करणार असून 25 नोव्हेंबर रोजी मुंबईत पोहचणार आहेत.

निर्भीड पोलिस अधिकारी : २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात कामटे यांनी वीरमरण पत्करले. २००९ मध्ये त्यांना मरणोत्तर अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आले. सोलापूर मधील दादागिरी नेत्यांना न झुगरता तसेच सर्व सोलापूर मधील दंगे बंद केल्यामुळे, त्यांनी निर्भीड पोलिस अधिकारी अशी उपमा प्राप्त केली होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.