ETV Bharat / state

काँग्रेसच्या काळात सिंचन योजना ठप्प, शेट्टी प्रश्न न समजून घेता आंदोलने करतात - नितीन गडकरी

देशात पाण्याची कमी नाही तर पाण्याच्या नियोजनाची कमी आहे. जर देशात पाणी संवर्धन करुन ते पाणी शेतीला दिल्यास एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

सांगलीच्या विटा येथील सभेत बोलताना नितीन गडकरी
author img

By

Published : Apr 21, 2019, 8:26 PM IST

सांगली - काँग्रेस आघाडीच्या काळात सिंचन योजनांची स्मारके बनली होती, अशी खरमरीत टीका केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. तसेच अलाहाबाद ते वाराणसी आम्ही जलमार्गच जर बांधला नसता तर प्रियांकांची नाव कशी गेली असती? असा खोचक टोला प्रियांका गांधी यांना लगावला. तर शेट्टी हे प्रश्न समजून न घेता आंदोलन करतात अशी टीकाही गडकरींनी केली आहे.

सांगलीच्या विटा येथील सभेत बोलताना नितीन गडकरी

सांगली लोकसभेचे भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ आज विटा येथे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सभेसाठी उमेदवार संजयकाका पाटील, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशात पाण्याची कमी नाही तर पाण्याच्या नियोजनाची कमी आहे. जर देशात पाणी संवर्धन करुन ते पाणी शेतीला दिल्यास एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. तर राज्यातील सिंचन योजनेवरून काँग्रेस आघाडीवर टीका करताना आघाडीच्या काळात महाराष्ट्रात अनेक सिंचन योजना सुरू झाल्या. पण त्यावेळेच्या सरकारमधील मंत्र्यांनी कंत्राटदाराकडून १० टक्के आगाऊ रक्कम घेतली. त्यामुळे १५-१५ वर्षांपासून हे प्रकल्प पूर्णपणे बंद पडले होते. यामुळे महाराष्ट्रातील ही बंद पडलेली सिंचन प्रकल्प स्मारके बनली होती, अशा शब्दात गडकरी यांनी बंद पडलेल्या सिंचन योजनांवरून आघाडी सरकारवर टीका केली.

प्रियांका गांधी अलाहाबादवरून वाराणसीला नावेत बसून गेल्या. यावेळी त्यांनी आमच्यावर टीका केली. मात्र, जर आम्ही अलाहाबाद ते वाराणसी जलमार्गच जर बांधला नसता तर तुमची नाव कशी गेली असती ? आम्ही गंगा शुद्ध केली म्हणून प्रियांका गंगेचे पाणी पिल्या. काँगेसचे सरकार असते तर ही वेळ आलीच नसती, अशा शब्दात गडकरी यांनी प्रियांका गांधी आणि काँग्रेसवर टीका केली.

दरम्यान, यावेळी गडकरींनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार व नेते राजू शेट्टी यांच्यावरही निशाणा साधला. नुसती ऊस दरावरून आंदोलने करण्यापेक्षा साखर कारखाना संदर्भातील प्रश्न समजून घ्या, असे अनेकदा मी राजू शेट्टींना सांगितले. पण राजू शेट्टी प्रश्न न समजून घेता आंदोलन करतात. आंदोलन करा, पण प्रश्न समजून घ्या. जर एकतर्फी आंदोलन केले आणि कारखानादारी संपुष्टात आली तर शेतकरी आपला ऊस कोणाकडे विकणार, याचे उत्तर शेट्टींनी द्यावे, असा सवाल गडकरींनी केला आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

Avbb

Feed send file name - R_MH_1_SNG_21_APR_2019_NITIN_GADKARI_SABHA_SRARFARAJ_SANADI - TO -
R_MH_4_SNG_21_APR_2019_NITIN_GADKARI_SABHA_SRARFARAJ_SANADI

स्लग - नितीन गडकरींच काँग्रेस आघाडीवर हल्लाबोल,सिंचनांचे केली होती स्मारके,तर प्रश्न समजून न घेता शेट्टी करतात आंदोलने..

अँकर - काँग्रेस आघाडीच्या काळात सिंचन योजना हे स्मारके बनली होती.अशी खरमरीत टीका केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. तसेच भाजपावर टीका करणाऱ्या प्रियांका गांधी यांच्यावर निशाणा साधताना अलाहाबाद ते वाराणसी आम्ही जलमार्गच जर बांधला नसता तर प्रियांकाची नाव कशी गेली असती ? असा खोचक टोला मंत्री गडकरी यांनी लगावला.तर शेट्टी हे प्रश्न समजून न घेता आंदोलन करतात अशी टीका केली आहे. सांगली लोकसभेचे भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ विटा येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
Body:व्ही वो - सांगली लोकसभेचे भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ आज विटा येथे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची सभा पार पडली.याप्रसंगी सभेसाठी उमेदवार संजयकाका पाटील,महसुल मंत्री चंद्रकांत पाटील,कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी आपल्या खात्याच्या माध्यमातून देशात केलेल्या विकासाचा पाढा वाचून दाखवत विविध मुद्दयावरून मंत्री गडकरी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. देशात पाण्याची कमी नाही ,तर पाण्याच्या नियोजनाची कमी आहे.जर देशात पाणी संवर्धन करुन ते पाणी शेतीला देऊ शकलो तर एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही.असा विश्वास मंत्री गडकरी यांनी व्यक्त केला.तर राज्यातील सिंचन योजनेवरून काँग्रेस आघाडीवर टीका करताना आघाडीच्या काळात महाराष्ट्रात अनेक सिंचन योजना सुरु झाल्या.पण त्यावेळच्या सरकार मधील मंत्र्यांनी कॉन्ट्रॅक्टर कडून १० टके ऍडव्हान्स घेतला, त्यामुळे १५ -१५ वर्षांपासून हे प्रकल्प पूर्णपणे बंद पडले होते. यामुळे महाराष्ट्रतील ही बंद पडलेली सिचन प्रकल्प स्मारके बनली होती,अशा शब्दात गडकरी यांनी बंद पडलेल्या सिचन योजनांवरून आघाडी सरकारवर टीका केली.

बाईट-: नितीन गडकरी - केंद्रीय दळणवळण मंत्री.

व्ही वो - भाजपावर टीका करणाऱ्या प्रियांका गांधी यांच्या टीकेचा समाचार घेताना मंत्री गडकरी यांनी प्रियंका गांधी अलाहाबाद वरून वाराणसीला नावेत बसून गेल्या,यावेळी त्यांनी आमच्यावर टीका केली.मात्र जर आम्ही अलाहाबाद ते वाराणसी जलमार्गच जर बांधला नसता तर तुमची नाव कशी गेली असती ? आम्ही गंगा शुद्ध केली म्हणून प्रियांका गंगेच पाणी पिल्या, काँगेसच सरकार असते तर ही वेळ आलीच नसती, अशा शब्दात गडकरी यांनी प्रियांका गांधी आणि काँग्रेसवर टीका केली.

बाईट-: नितीन गडकरी - केंद्रीय दळणवळण मंत्री.

व्ही वो - तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार व नेते राजू शेट्टी यांच्यावर निशाणा साधताना.नुसती ऊस दरावरून आंदोलने करण्यापेक्षा साखर कारखाना संदर्भातील प्रश्न समजून घ्या असे अनेकदा मी राजू शेट्टीना सांगितले,
पण राजू शेट्टी प्रश्न न समजून घेता आंदोलन करतात,आंदोलन करा, पण प्रश्न समजून घ्या, जर एकतर्फी आंदोलन केलं तर कारखानादारी संपुष्टात आली तर शेतकरी आपला ऊस कोणाकडे विकणार आहे.याचे उत्तर शेट्टीनी दयावे असा सवाल गडकरीनी केला आहे.

बाईट-: नितीन गडकरी - केंद्रीय दळणवळण मंत्री. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.