ETV Bharat / state

सहकार मंत्रालयाच्या स्थापनेने सहकाराची लागणार 'वाट' की मिळणार नवीन वाट? - काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे राहिले प्राबल्य

केंद्राच्या सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे राज्यातील सहकाराला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्याबरोबर मंत्रालयाच्या माध्यमातून दुरुपयोगही होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत सांगली जिल्ह्यातून व्यक्त करण्यात येत आहे.

विशेष बातमी
विशेष बातमी
author img

By

Published : Jul 8, 2021, 7:35 PM IST

Updated : Jul 8, 2021, 7:50 PM IST

सांगली - केंद्राच्या सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे राज्यातील सहकाराला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्याबरोबर मंत्रालयाच्या माध्यमातून दुरुपयोगही होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत सांगली जिल्ह्यातून व्यक्त करण्यात येत आहे.

सहकार मंत्रालयामुळे सहकाराला नवी दिशा मिळण्याबरोबर पारदर्शकतेची अपेक्षा

सहकार पंढरी म्हणून सांगलीची ओळख
सहकार पंढरी म्हणून सांगली जिल्ह्याची ओळख आहे. या जिल्ह्यामधून सहकाराचे जाळे विणण्याचे काम माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, लोकनेते राजरामबापू पाटील, सहकार महर्षी गुलाबराव पाटील, यांच्यापासून अनेक नेत्यांनी केले. त्यामुळेच सहकार पंढरी म्हणून आज सांगलीची राज्यात ओळख आहे. साखर कारखानदारी, सूतगिरण्या, दूध संघ, सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँक, अशा अनेक पातळ्यांच्या माध्यमातून सहकाराचे क्षेत्र विस्तारले गेले आहे. सहकाराने खरेतर सर्वसामान्य व्यक्तीला आधार देण्याचा आजपर्यंत काम केले, अशा गोष्टी होत असताना याच सहकार क्षेत्रामध्ये भ्रष्टाचाराच्या अनेक गोष्टी समोर आल्या.

सहकाराचे जाळे विस्तारले
सांगली जिल्ह्यामध्ये सहकाराचे जाळे आज मोठ्या प्रमाणात पसरले आहे. टप्प्याटप्प्याने या सहकार क्षेत्राचा विस्तार होत गेला. प्रामुख्याने कॉंग्रेसचे जिल्ह्यात सहकार क्षेत्रावर प्राबल्य होते, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सहकार क्षेत्रात आपली पकड निर्माण केली होती. त्यानंतर केंद्र आणि राज्यात सत्तेत आल्यानंतर भाजपानेही जिल्ह्यातल्या सहकार क्षेत्रात आपले अस्तित्व दाखवून दिले. जिल्हा मध्यवर्ती बँक, बाजार समित्या, सहकारी सोसायटी, दूध संघ अशा अनेक पातळ्यांवर मुख्यता राष्ट्रवादी आणि त्या पाठोपाठ आता भाजपाचे प्राबल्य पाहायला मिळते.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे राहिले प्राबल्य

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, वसंतदादा पाटील यांचे नातू व काँग्रेस नेते विशाल पाटील, राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड या घराण्याचे सहकार क्षेत्रावर चांगली पकड आहे. दुसऱ्या बाजूला भाजपाचे खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार व भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह अनेक भाजपा नेत्यांचाही सहकारी संस्था आहेत.

एकत्रित सहकार क्षेत्रात मिळून काम
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्रित सत्तेत आहे. अशीच काहीशी परिस्थिती सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती आणि इतरही काही सहकारी संस्थांमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे जिल्ह्यात सध्या भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा सर्वांचे मिळून सहकार क्षेत्रावर पकड आहे. सहकार हा टिकला पाहिजे सहकार हा वाढला पाहिजे, या भावनेतून सरकारकडून अनेक गोष्टी सुरू आहेत. आता केंद्र सरकारकडून देशपातळीवर सहकार मंत्रालय वेगळ्या पद्धतीने स्थापन करण्यात आला आहे, त्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

ग्रामीण भागाच्या उद्योगाला चालना मिळणार - खोत
माजी कृषी राज्यमंत्री व आमदार सदाभाऊ खोत यांनी केंद्राच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. आमदार खोत म्हणाले, सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये उद्योगाला चालना मिळाली. सर्वसामान्य जनतेच्या सहभागातून अनेक सहकारी संस्था उदयाला आल्या. परंतु काही महत्त्वाकांक्षी लोकांनी सहकार चळवळ ही राजकारणाची बटिक बनवली आहे, त्यामुळे सामान्य माणूस सहकारापासून दूर फेकला गेला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे अनेक सहकारी संस्था नव्याने उदयाला येतील व लाखो तरुणांना त्या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल. आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. या खात्याच्या माध्यमातून विविध राज्यांमध्ये सहकार वाढण्यासाठी निश्चितच उपयोग होईल. आता केद्रांने गाव पातळीवरच्या सहकारी संस्थाचा संबंध थेट केंद्र सरकारच्या सहकार खात्याशी ठेवत नव्याने प्रवास सुरू करावा. राज्य सरकारच्या माध्यमातून या सहकार खात्याचा कारभार चालवू नये, तथापि यावर केंद्रशासनाचे नियंत्रण असावे. तरच ग्रामीण भागात सहकाराचे जाळे नव्याने उभे राहील. परंतु राज्य सरकारच्या माध्यमातूनच जर योजना राबवल्या गेल्या तर पूर्वीच्याच सहकार सम्राटांच्या हातात सहकार खात्याची संपूर्ण सूत्रे जातील, अशी भीती व्यक्त केली आहे.

'सामान्य व्यक्तीच्या हिताच्या दृष्टीने काम होणे गरजेचे'
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व अनेक सहकारी संस्था चालवणारे वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी उपाध्यक्ष सुरेश पाटील म्हणाले, केंद्र सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या सहकार मंत्रालयाचे आपण स्वागत करतो. अमित शहा यांच्यासारख्या एका वजनदार व्यक्तीकडे हे खाते सोपवले आहे. जे आजपर्यंत कृषी खात्याशी जोडले गेले होते. महाराष्ट्र, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्रामुळे क्रांती झाली आहे. आज कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश बरोबर कोलकत्ता याठिकाणी थोड्याफार प्रमाणात सहकाराचे क्षेत्र आहे. आता केंद्र सरकारने स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन करून त्याची जबाबदारी अमित शहा यांच्याकडे दिली आहे. शहा हे एक वजनदार मंत्री आहेत, आणि त्यांनी या संधीचा फायदा सर्वसामान्य आणि शेतकरी यांच्यासाठी करत संपूर्ण देशात सहकाराचे जाळे विणल्यास नक्कीच फायदा होईल, असे मत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

'नव्या मंत्रालयाने सुसंगती निर्माण होईल'
येथील व्यापारी महासंघाचे नेते अतुल शहा यांनी यावर बोलताना म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात आज सहकारचं क्षेत्र पसरला आहे आणि सहकारामुळे सर्वसामान्यांचा फायदा आतापर्यंत झाला आहे, तर दुसर्‍या बाजूला या सहकारी संस्थांमध्ये भ्रष्टाचाराचे हे प्रकार अनेक घडले आहेत, त्यामुळे आता केंद्र सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या सहकार मंत्रालयामुळे सहकार क्षेत्रामध्ये सुसंगती निर्माण होण्याचा दृष्टीने पडलेले पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. या सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून पारदर्शक कारभार खूप महत्त्वाचा आहे. तरच खऱ्या अर्थाने सहकार क्षेत्राचा आणि सर्वसामान्य माणसाचा उद्धार होईल असे, मत शहा यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा - शिक्षणाचा काहीही संबंध नसलेले लोक शिक्षण खाते सांभाळतात - राऊत

Last Updated : Jul 8, 2021, 7:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.