ETV Bharat / state

पालिकेच्या सावली बेघर केंद्रातील ३७ जणांसह मनपा क्षेत्रातील ४४ जणांना कोरोनाची लागण

author img

By

Published : Jul 15, 2020, 5:32 PM IST

सांगली महापालिकेच्या सावली बेघर केंद्रात एक बेघर व्यक्तीस सहा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर या परिसराला सील करून येथील लोकांचे स्वॅब घेण्यात आले होते. यापैकी ३७ जणांचे अहवाल हे बुधवारी दुपारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर पालिका प्रशासनाने नव्या कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी कोरोना रुग्णालयात दाखल केले आहे. तर, दुसरीकडे पालिका क्षेत्रातील ४४ जण बुधवारी दुपारपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

मनपा क्षेत्रातील ४४ जणांना कोरोनाची लागण

सांगली - सांगली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर वाढत निघाला आहे. बुधवारी महापालिका क्षेत्रातील आणखी ४४ जण कोरोनाबाधित झाले आहेत. तर, सांगली महापालिकेच्या सावली बेघर केंद्रातील तब्बल ३७ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली आहे.

सांगली महापालिका क्षेत्रातल्या कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. बुधवारी दुपारपर्यंत सांगली महापालिका क्षेत्रातील तब्बल ४४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे सांगली महापालिकेच्याच्या सावली बेघर निवारा केंद्रातील ३७ जणांचा समावेश आहे. शहरातील आपटा पोलीस चौकीच्या मागे बंद पडलेल्या पालिकेच्या शाळेत महापालिका आणि इंसाफ फाउंडेशनच्या माध्यमातून हे केंद्र चालवले जाते. याठिकाणी सुमारे ५०हून अधिक भटक्या आणि बेघर लोकांचे संगोपन केले जाते. याठिकाणी नव्याने दाखल झालेल्या एक बेघर व्यक्तीस सहा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर पालिकेने सावली बेघर केंद्र कंटेन्मेंट झोन करत, सर्वांना क्वारंटाईन केले. सर्वांचे स्वॅब घेण्यात आले होते. यापैकी ३७ जणांचे अहवाल हे बुधवारी दुपारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर पालिका प्रशासनाने नव्या कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी कोरोना रुग्णालयात दाखल केले आहे.

तसेच महापालिका क्षेत्रातील आणखी ८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात सांगलीवाडी येथील १, गणेशनगर कुदळे प्लॉट ३, सांगली-मिरज रोडवरील एका रुग्णालयातील १ आणि मिरज शहरातील मंगळवार पेठ १, व कमानवेस येथील १ असे एकूण पालिका क्षेत्रातील ४४ जण बुधवारी दुपारपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर, सावली बेघर केंद्रातील एकाच वेळी ३७ जणांना कोरोनाची लागण झाल्याने प्राशसन हादरून गेले आहे. ज्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता, तिथे औषध फवारणी करून, कंटेंन्मेंट झोन करण्याचे काम युद्धपातळीवर पालिका प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची माहिती सांगली महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.