ETV Bharat / state

मिरज, पलूससह वाळवामध्ये अतिवृष्टी तर नागठाणे बंधारा पाण्याखाली - नागठाणे बंधारा न्यूज

जिल्ह्यात बुधवारपासून जोरदार पाऊस पडत आहे. गेल्या 24 तासात मिरज, पलूस आणि वाळवा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. वाळवा-इस्लामपूर तालुक्यात 97.1, मिरज तालुक्‍यात 64.01 तर पलूस तालुक्यात 67.3 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. इतर तालुक्यातही कमी-अधिक प्रमाणात पावसाची संततधार आहेत.

nagthane dam overflow due to rain in satara
मिरज, पलूससह वाळवामध्ये अतिवृष्टी तर नागठाणे बंधारा पाण्याखाली
author img

By

Published : Jun 17, 2021, 7:53 PM IST

Updated : Jun 17, 2021, 8:33 PM IST

सांगली - जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मिरज, पलूस आणि वाळवा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू असल्यामुळे पाणीपातळी वाढून नागठाणे येथील कृष्णा नदीवरील बंधारा पाण्याखाली गेला आहे. प्रशासनाकडून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

मिरज, पलूससह वाळवामध्ये अतिवृष्टी तर नागठाणे बंधारा पाण्याखाली

या 'तीन' तालुक्यातील अतिवृष्टी

जिल्ह्यात बुधवारपासून जोरदार पाऊस पडत आहे. गेल्या 24 तासात मिरज, पलूस आणि वाळवा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. वाळवा-इस्लामपूर तालुक्यात 97.1, मिरज तालुक्‍यात 64.01 तर पलूस तालुक्यात 67.3 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. इतर तालुक्यातही कमी-अधिक प्रमाणात पावसाची संततधार आहेत.

नागठाणे बंधारा पाण्याखाली

कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रातही दोन दिवसांपासून संततधार असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे पलूस तालुक्यातील नागठाणे येथील कृष्णा नदीच्या पातळीत वाढ झाल्याने बंधारा पाण्याखाली गेला आहे. यामुळे नागठाणे आणि शिरगाव या गावाचा जवळचा संपर्क तुटला आहे. पाटबंधारे प्रशासनाकडून खबरदारी म्हणून बंधाऱ्यावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

हेही वाचा - उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी हिंदू-मुस्लिम दंगे भडकवले जातील - अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर

Last Updated : Jun 17, 2021, 8:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.