ETV Bharat / state

स्वयंपाक केला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात घातली बॅट, उपचारादरम्यान मृत्यू

स्वयंपाक केला नाही, म्हणून पतीने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात बॅट घालून खून केल्याचे घटना घडली आहे.

Murder of wife for not cooking; Husband arrested
स्वयंपाक केला नाही म्हणून पत्नीचा केला खून; पतीला अटक
author img

By

Published : Apr 30, 2021, 11:44 AM IST

Updated : May 5, 2021, 3:53 PM IST

सांगली - स्वयंपाक केला नाही, म्हणून पतीने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात बॅट घालून खून केल्याची घटना घडली आहे. कुपवाडमध्ये ही घटना घडली असुन कोमल जाधव असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती राहुल जाधव याला अटक करण्यात आली आहे.

कुपवाड येथील अहिल्यानगर झोपडपट्टी येथे राहत असलेल्या कोमल राहूल जाधव या महिलेस तिचा पती राहूल बाळासाहेब जाधव याने मला भूक लागली आहे, स्वयंपाक का केला नाहीस, असे म्हणून चिडून पत्नीला बॅटने मारहाण केली होती, या मारहाणीत कोमल जाधव या गंभीर जखमी झाल्या होत्या. यानंतर जखमी कोमल यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. या मारहाण प्रकरणी पत्नी कोमल जाधव यांनी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती राहुल जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान उपचार सुरू असताना कोमल हिचा मृत्यू झाला आहे. यानंतर पती राहुल जाधव याला कुपवाड पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहेत.

Last Updated : May 5, 2021, 3:53 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.