सांगली - सांगलीचा महापूर आता जवळपास ओसरला असून कृष्णा नदीची पाणी पातळी आता कमी झाली आहे. गेल्या तीन दिवसात १२ फूट पाणी पातळी कमी झाली आहे. सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी ४७ फुटावर गेली आहे. तर आता शहर स्वच्छ करण्याची मोहीम युद्ध पातळीवर सुरू आहे.
आज सकाळी मुंबई, पुणे, पिंपरी या महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी आपल्या यंत्रणेसह सांगलीत दाखल होऊन स्वच्छतेला सुरुवात केली आहे. यासाठी सुमारे दीड हजार कर्मचारी बाहेरून सांगलीत आले आहेत. तर एकाचवेळी सांगलीच्या पूर भागात स्वच्छता केली जात आहे. दरम्यान, पुढील ५ दिवस हे कर्मचारी सांगलीत स्वछता करणार आहेत.