ETV Bharat / state

मंत्री जयंत पाटील यांच्या सत्कार सोहळ्यात खा.शेट्टी, खा.पाटील यानी विरोधकांचा घेतला चिमटा - श्रीनिवास पाटील बातमी सांगली

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या महाआघाडीत स्थापन झालेल्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जयंत पाटील प्रथमच वाळवा तालुक्यात आले. यावेळी पाटील यांचे कासेगाव या मूळ गावी आणि इस्लामपूर शहरामध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर इस्लामपूरमध्ये खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते जयंत पाटील यांचा नागरी सत्कार सोहळा पार पडला.

sangli
सत्कार समारंभ
author img

By

Published : Dec 9, 2019, 3:25 PM IST

सांगली- इस्लामपूरमध्ये कॅबिनेट मंत्री जयंत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांची तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. जयंत पाटील यांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित सभेत तिन्ही नेत्यांनी एकमेकांचे चिमटे काढत विरोधकांचा समाचार घेतला.

प्रतिक्रिया देताना कॅबिनेट मंत्री जयंत पाटील, माजी खासदार राजू शेट्टी आणि खासदार श्रीनिवास पाटील

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या महाआघाडीत स्थापन झालेल्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जयंत पाटील प्रथमच वाळवा तालुक्यात आले. यावेळी पाटील यांचे कासेगाव या मूळ गावी आणि इस्लामपूर शहरामध्ये मोठया जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर इस्लामपूरमध्ये खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते जयंत पाटील यांचा नागरी सत्कार सोहळा पार पडला. स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी देखील या कार्यक्रमला उपस्थित होते. यावेळी या तिन्ही नेत्यांनी आपल्या भाषणातून तुफान फटकेबाजी केली.

एका दिवसाच्या अधिवेशनात माजी मुख्यमंत्रीची विरोधी पक्षनेता म्हणून निवड झाल्यानंतर जयंत पाटील यांनी अधिवेशनात केलेले भाषण हे नमुन्याचे भाषण होते. लोकसभेत गेल्यानंतर लोक 'जायंट किलर' म्हणून मला बोलवू लागले आणि शरद पवार यांच्या साताराच्या सभेनंतर पावसा एवढी मते मला पडली, असे खासदार श्रीनिवास पाटील म्हणताच सभेत हशा पिकला.

तर, राज्याच्या तिजोरीच्या चाव्या जयंत पाटील यांच्याकडेच येतील असे दिसते आहे. यावेळी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करायचा आहे, हे लक्षात ठेवा. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत जे तुम्ही सोडवावेत अशी मागणी यावेळी खासदार राजू शेट्टी यांनी जयंत पाटील यांच्याकडे केली. तसेच ऊस कारखाने सुरू झाले असून आम्ही एफआरपी २०० रुपये मागतो आहे. ही मागणी देखील जयंत पाटील पूर्ण करतील अशी अपेक्षा असल्याचे शेट्टी यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले.

तर, राजू शेट्टींच्या मागण्यांची दखल घेत, राजू शेट्टी यांनाच महाराष्ट्राचा अर्थमंत्री केले तर फार बरे होईल. असा मिश्किल टोला लगावत महाराष्ट्राच्या डोक्यावर १० लाख ७१ हजार कोटींचे कर्ज आहे. २ लाख कोटींचे कर्ज वेगवेगळ्या प्रकल्पासाठी आहे. या परिस्थितीतून महाराष्ट्रची प्रगती न थांबता महाराष्ट्राचा गाडा नीट चालवू. मात्र, यासाठी आम्हाला जरा वेळ द्यायला पाहिजे, असे महाविकास आघाडीचे मंत्री जयंतराव पाटील यांनी सांगितले.

त्याचबरोबर, आम्ही अजून नीट पुस्तक उघडले नाहीत. या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी वेळ द्यायला हवा. जे राष्ट्रवादी पक्ष सोडून गेले ते आता फोन करून पुन्हा राष्ट्रवादीत येण्याची भाषा करू लागले आहेत. आणि राष्ट्रवादी नेहमी बेरजेचे राजकारण करते, असे स्पष्ट करत भाजपात गेलेली राष्ट्रवादीचे नेते परत येतील, असे सुतोवाच पाटील यांनी केले. तसेच महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीचे आणि विरोधकांना इशारे देणारी शायरी सादर करत जयंतराव पाटील यांनी विरोधाकांना टोला लगावला.

हेही वाचा- लुटमार करत दोन महिलांचा खून केल्याप्रकरणी एकाला जन्मठेप

Intro:File Name - mh_sng_02_mantri_patil_satkara_sohla_vis_01_7203751 - to -
mh_sng_02_mantri_patil_satkara_sohla_byt_04_7203751

स्लग - मंत्री जयंत पाटील,खासदार श्रीनिवास पाटील आणि राजू शेट्टींच्या तुफान फटकेबाजी...

अँकर - सांगलीच्या इस्लामपूर मध्ये कॅबिनेट मंत्री जयंतराव पाटील ,खासदार श्रीनिवास पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांची तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली.जयंतराव पाटील यांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित सभेत तिन्ही नेत्यांनी एकमेकांचे चिमटे काढत,विरोधकांचा समाचार घेतला.Body:व्ही वो - शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँगेस पक्षाच्या महाआघाडीत स्थापन झालेल्या सरकार मध्ये कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जयंत पाटील प्रथमच वाळवा तालुक्यात आले.यावेळी पाटील यांचे कासेगाव या मूळ गावी आणि इस्लामपूर शहरामध्ये मोठया जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर इस्लामपूर मध्ये खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते जयंत पाटील यांचा नागरी सत्कार सोहळा पार पडला.स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी देखील या कार्यक्रमला उपस्थित होते. यावेळी या तिन्ही नेत्यांनी आपल्या भाषणात तुफान फटकेबाजी केली.

साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी यावेळी बोलताना,एका दिवसाच्या अधिवेशनात माजी मुख्यमंत्रीची विरोधी पक्षनेता म्हणून निवड झाल्यानंतर जयंत पाटील यांनी अधिवेशनात केलेले भाषण हे नमुन्याचे भाषण होते.लोकसभेत गेल्यानंतर लोक जायंट किलर म्हणून मला बोलवू लागले, आणि शरद पावर यांच्या सातारच्या सभेनंतर पावसएवढं मतं मला पडली,असे म्हणताच सभेत हशा पिकला.

बाईट-: श्रीनिवास पाटील, खासदार

व्ही ओ - तर स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी बोलताना राज्याच्या तिजोरीच्या चाव्या जयंत पाटील यांच्याकडेच येतील,असे दिसतंय.त्यावेळी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करायचा आहे,हे लक्षात ठेवा.शेतकऱ्यांना वीज बिले खूप आली आहेत.असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत,जे तुम्ही सोडवावेत ,अशी मागणी यावेळी राजू शेट्टी यांनी जयंत पाटील यांच्याकडे केली.तसेच
ऊस कारखाने सुरू झालेत. आणि आम्ही एफआरपी अधिक 200 रुपये मागतोय, ती ही मागणी आमची पूर्ण कराल,अशी अपेक्षा असल्याचे शेट्टी यांनी आपल्या भाषणातुन स्पष्ट केले.

बाईट/; राजू शेट्टी, माजी खासदार

व्ही ओ - तर मंत्री जयंतराव पाटील यांनी यावेळी बोलताना राजू शेट्टींच्या मागण्यांची दाखल घेत, राजू शेट्टी यांनाच महाराष्ट्रचा अर्थमंत्री केलं ,तर फार बरे होईल.असा मिश्किल टोला लागवत ,महाराष्ट्रच्या डोक्यावर 10 लाख 71 हजार कोटीचं कर्ज आहे.2 लाख कोटींचे कर्ज वेगवेगळ्या प्रकल्पासाठी आहे.या परिस्थितीतुन महाराष्ट्रची प्रगती न थांबता महाराष्ट्रचा गाडा नीट चालवू,मात्र यासाठी आम्हाला जरा वेळ द्यायला पाहिजे.आम्ही अजून नीट पुस्तक उघडले नाहीत.या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी वेळ द्यायला हवा.जे राष्ट्रवादी पक्ष सोडून गेले ते आता फोन करुन पुन्हा राष्ट्रवादीत येण्याची भाषा करू लागलेत.आणि राष्ट्रवादी नेहमी बेरजेचे राजकारण करते, असे स्पष्ट करत भाजपात गेलेली राष्ट्रवादीची नेते परत येतील असे सूतोवाच पाटील यांनी केले,तसेच महाराष्ट्रच्या राजकीय परिस्थितीचे आणि विरोधकांना इशारे देणारी शायरी सादर करत जयंतराव पाटील यांनी विरोधाकांना टोला लगावला.

बाईट-:जयंत पाटील, कॅबिनेट मंत्रीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.