सांगली - कोरोना उपचाराखाली ज्या रुग्णालयांनी अधिकचे बिल घेतले, त्यांच्या विरोधात खासदार संजयकाका पाटील यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. रुग्णालयांकडून जादा पैसे आकारण्याबाबत जिल्हाधिकारी समवेत लोकप्रतिनिधींची बैठक घेऊ. त्यानंतर पैसे परत करण्यासाठी वेळ देऊ. मात्र, संबंधित रुग्णालयांकडून रुग्णांचे पैसे परत न मिळाल्यास रुग्णालयांसमोर ठिय्या आंदोलन करू, अशा इशारा खासदार संजयकाका पाटील यांनी दिला. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हेही वाचा - "संजय राऊत बिनबुडाचा लोटा; खातो सेनेचे, जागतो पवारांना"
रुग्णालयांकडून रुग्णांची लूट
कोरोना उपचारादरम्यान सांगली जिल्ह्यातल्या अनेक खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून भरमसाठ बिल घेतल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. जनता कोरोनाच्या आर्थिक संकटात असताना रुग्णालयांकडून झालेल्या लुटीबाबत सांगलीचे खासदार संजयकाका पाटील आक्रमक झाले आहेत. कोरोना उपचाराखाली रुग्णांकडून भरमसाठ बिल आकारणाऱ्या रुग्णालयांबाबत जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींची गेल्या काही दिवसांत जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीमध्ये संबंधित रुग्णालयाकडून घेण्यात आलेले अधिकचे पैसे रुग्णांना परत देण्याबाबत मागणी करण्यात येणार आहे. पंधरा दिवसांत याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून रुग्णालयाने पैसे परत द्यावे, ही आग्रही भूमिका असणार आहे. अन्यथा रुग्णांच्या नातेवाईकांना घेऊन संबंधित त्या-त्या रुग्णालयांच्या समोर ठिय्या आंदोलन करणार, असा इशारा खासदार संजयकाका पाटील यांनी दिला.
हेही वाचा - 'राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय, तर मराठा समाजाचे सामाजिक आरक्षण टिकले नाही'