सांगली - हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या कडेगावात मोठ्या उत्साहात मोहरम संपन्न झाला. या निमित्ताने गगनचुंबी ताबूत भेटींचा अनोखा सोहळा पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी कडेगावात उपस्थिती लावली होती.
कडेगावात गेल्या १५० वर्षंपासून गगनचुंबी ताबूत भेटीचा सोहळा पार पडतो. यावेळी गावातील बारा बलुतेदार एकत्र येऊन हा सण साजरा करतात. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे दीडशे ते दोनशे फुट उंच असणारे गगनचुंबी ताबूत बांधण्याचे काम सर्व समाजातील लोकांनी एकत्र येऊन करण्याची प्रथा आहे .मुस्लिम धर्मीयांच्या बकरी ईद नंतर या ताबूत बांधणीच्या कामाला सुरुवात होते. या ताबूत भेटींचा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातून हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती.
हेही वाचासोलापुरात जातीय सलोख्याची अनोखी परंपरा, माढेकरांनी एकत्र साजरा केला गणेशोत्सवसह मोहरम
सोहळ्याला ऐतिहासिक परंपरा...
तत्कालीन संस्थानिक भाऊसाहेब देशपांडे सरकार यांनी या ताबूत सोहळ्याचा प्रारंभ केला. त्याकाळी कराड येथे पार पडणाऱ्या ताबूत भेटी सोहळा पाहण्यासाठी देशपांडे सरकार गेले होते. त्या ठिकाणी योग्य मानसन्मान न मिळाल्याने संतप्त झालेल्या देशपांडे सरकार यांनी कडेगाव मध्ये जगात नावाजले जाईल असा ताबूत भेटींचा सोहळा सुरू करण्याचा निर्धार केला. त्या काळापासून कडेगावात सर्व समावेशक असा मोहरमचा ताबूत भेटींची सोहळा सुरू झाला.
हेही वाचा भिवंडीत मोहरम निमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल
यामध्ये गावातील हिंदू समाजाचे ७ आणि मुस्लिम समाजाचे ७ ताबूत असतात. यंदा कडेगाव शहरातील जुने एसटी स्टँड चौकात या ताबूतांच्या भेटी पार पडल्या.