ETV Bharat / state

हे म्हणजे, "ग्लास सुरू, क्लास बंद" आघाडी सरकारवर आमदार सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल - शाळा बंद आमदार सदाभाऊ खोत प्रतिक्रिया

"ग्लास सुरू, क्लास बंद" असे सरकारचे धोरण असल्याची टीका माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. राज्यातील जनतेला संकटाच्या खाईत लोटून, आर्थिक दुबळे करायचा उद्योग असल्याचाही आरोप आमदार खोत यांनी केला आहे.

MLA Sadabhau Khot comment on school close
शाळा बंद आमदार सदाभाऊ खोत प्रतिक्रिया
author img

By

Published : Jan 9, 2022, 5:29 PM IST

सांगली - "ग्लास सुरू, क्लास बंद" असे सरकारचे धोरण असल्याची टीका माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. राज्यातील जनतेला संकटाच्या खाईत लोटून, आर्थिक दुबळे करायचा उद्योग असल्याचाही आरोप आमदार खोत यांनी केला आहे.

माहिती देताना आमदार सदाभाऊ खोत

हेही वाचा - Bullock Cart Race : सर्जा-राजा मैदानात, राज्यातील पहिला बैलगाडी शर्यतीचा थरार रंगला सांगलीत

कोरनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून लावण्यात आलेले कडक निर्बंध आणि शाळा बंद यावरून आमदार सदाभाऊ खोत यांनी इस्लामपूरमध्ये बोलताना महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.

कडक निर्बंधांवरून सरकारवर टीका

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. महाविद्यालये, शाळा बंद करण्याबरोबर व्यवसाय आणि जनतेवर कोरोना नियमांचे कडक निर्बंध लागू करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. यावरून महाविकास आघाडी सरकारवर माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी हल्लाबोल केला आहे. गेल्या दोन वर्षांत शालेय विद्यार्थ्यांचे न भरून येणार, असे शैक्षणिक नुकसान झाले आहे. राज्य सरकारकडून योग्य ती खबरदारी आणि नियमवाली करून शाळा कशा सुरू राहतील, याकडे लक्ष देणे गरजेचे होते. विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडलेला आहे. मात्र, दुसरीकडे राज्य सरकार दारूची दुकाने सुरू ठेवून कर कपात करत आहेत. हे म्हणजे "दारूचे ग्लास सुरू आणि क्लास मात्र बंद", असे सरकारचे धोरण असून कोरोना नियमांचे काटेकोर पालन आणि विद्यार्थ्यांचे लसीकरण करणे हा मार्ग असताना घातलेले कडक निर्बंध तरुण पिढीला शिक्षणापासून वंचित ठेवून सर्व सामान्य जनतेला दुबळे करणारे असल्याचा, आरोप आमदार सदाभाऊ खोत यांनी केला.

हेही वाचा - Year Ender 2021 Sangli : सांगली जिल्ह्यातील सरत्या वर्षातील महत्त्वाच्या 11 घटनांचा आढावा

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.