सांगली : शरद पवार नावाचा माणूस आपला वैचारिक शत्रू ( Sharad Pawar is Our Ideological Enemy ) आहे ( BJP MLA Gopichand Padalkar has Criticized ), अशा शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका ( Gopichand Padalkar Criticised on Sharad Pawar ) केली आहे. तसेच शरद पवार हे जातीयवादी ( MLA Padalkar has Also Expressed Opinion ) असून, त्यांच्याबद्दल समाजाने आता जागृत झाले पाहिजे, असे मतसुद्धा आमदार पडळकर यांनी व्यक्त केले आहे. कवठे महांकाळच्या आरेवाडी येथे आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते.
बिरोबा बनात दसरा मेळावा आयोजित कार्यक्रमात गोपीचंद पडळकरांची टीका : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वतीने समस्त धनगर समाजाचे श्रद्धास्थान असणाऱ्या कवठे महांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील बिरोबा बनात दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. आरेवाडी ग्रामपंचायत आणि बिरोब देवस्थान समितीकडून परवानगी नाकारली असताना पडळकर यांनी आदेश धुडकावून बिरोब बनात मेळावा घेतला. मेळाव्याला हजारोंच्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते.
सर्वात मोठा वैचारिक शत्रू तसेच पडळकर म्हणाले, धनगर समाजाचे मेंढपाळ असतील किंवा अन्य प्रश्न असतील ते आपण समजून घेणार आहे. मात्र, आता राजकीय प्रश्न आहे. तुम्ही सगळ्यांनी आता पुढे आले पाहिजे. आपल्या समाजाचा सर्वात मोठा वैचारिक शत्रू हा बारामतीचा शरदचंद्र पवार आहे. अशा माणसाच्या हस्ते चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचर उद्घाटन करायला आल्यावर आपला समाजातील काही हेलिकॉप्टरमधून येणाऱ्या शरद पवारांना पाहून, साहेब आले..... साहेब आले.... असे म्हणत होते. पण, त्या हेलिकॉप्टरमध्ये आपला कर्दनकाळा बसलाय, अशा भानगडी तुम्ही करू नका, अशा शब्दांत आमदार पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे.