सांगली : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधु ब्रह्मानंद पडळकर यांनी सांगलीच्या मिरजेतील दुकाने आणि हॉटेल पाडल्याच्या निषेधार्थ आज मिरज शहर बंद आंदोलन करण्यात येत ( Mixed Response Of All Party Band ) आहे. सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत मिरज बंदची हाक देण्यात आली असून याला सकाळपासून संमिश्र प्रतिसाद मिळत ( Band to Protest Demolition In Sangli ) आहे.
8 मालमत्ता जमीनतदोस्त : मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील इमारती, दुकाने आणि हॉटेल, अशा मालमत्ता भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू जिल्हा परिषद सदस्य ब्रम्हानंद पडळकर यांनी शुक्रवारी रातोरात पाडली आहेत. जागेचा ताबा मिळवण्यासाठी चार जेसीबी आणि हजारभर लोक घेऊन 8 मालमत्ता जमीनतदोस्त केल्या ( eight properties demolished by jcb In Sangli ) आहेत. यावेळी प्रचंड दहशत माजवून पडळकर आणि त्यांच्या गुंडांनी बांधकाम पाडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी ( allegation on gopichand padalkar brothers ) केला. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांकडून जेसीबीवर दगडफेक करण्यात आली. त्याचबरोबर पडळकर यांच्यासोबत असणाऱ्या एका चार चाकी गाडीवर ही दगडफेक करण्यात आली. यामुळे परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर प्रचंड पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता.
ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह सुमारे अनेकांवर गुन्हा : दरम्यान या सर्व प्रकरणी ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह सुमारे दीडशे जणांच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. बेकायदेशीर जमाव जमवणे, मारहाण करणे, धमकी देणे अशा स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले आहेत. तर या प्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन पडळकरांकडून करण्यात आलेल्या कृत्याच्या निषेधार्थ मिरज शहर बंदची हाक देण्यात आली.
बंद पाळण्याचे आवाहन : आज सकाळपासून मिरज शहर बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट, एमआयएम, पीआरपी, आरपीआय पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांच्यावतीने उत्स्फूर्तपणे बंद पाळण्याबाबतचे आवाहन करण्यात आले आहे. पीडित दुकानदार आणि हॉटेल मालकांना न्याय मिळावा,आणि ब्रह्मानंद पडळकर,यांच्यावर कडक कारवाई करावी,अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
महापालिका प्रशासनाकडून नोटीस : मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडचे सध्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील अतिक्रमण गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाकडून पाडण्यात येत आहेत. याच रस्त्यावर एसटी स्टँड नजिक असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील असणारी 55 गुंठे जागा आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर आणि महेश कारंडे नामक व्यक्तीचे असून त्यांचे जागेवरील असणारे अतिक्रमण 24 तासात पाडावे, अशी नोटीस महापालिका प्रशासनाकडून बजावण्यात आली होती. अशा आशयाचे पत्र आता समोर आले आहे.