ETV Bharat / state

अधिकाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढण्याची सरकारवर वेळ - जयंत पाटील - jayant patil commented on salary

राज्यातील सरकारी यंत्रणा आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या वेतनासाठी कर्ज काढायची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी सांगलीत केले.

जयंत पाटील
जयंत पाटील
author img

By

Published : Jun 8, 2020, 6:55 PM IST

सांगली - जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुखांसह सरकारी यंत्रणांचे वेतन कसे द्यायचे? हा प्रश्न सरकारसमोर निर्माण झाला आहे. या वेतनासाठी कर्ज काढायची स्थिती निर्माण झाल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. यावर मार्ग काढण्यासाठी सरकार सकारात्मक असून प्रसंगी प्रयत्नांची पराकाष्टा करेल, असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा - सांगली : यंदा पूर परस्थितीची शक्यता नाही, मात्र तरीही प्रशासन सज्ज - जयंत पाटील

राज्य सरकार जनतेच्या गोळा झालेल्या विविध करांच्या माध्यमातून चालते. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय, व्यापार ठप्प झाले. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा कर सरकारच्या तिजोरीत जमा झाला नाही. परिणामी आता राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख असो किंवा सरकारी यंत्रणा असेल या सर्वांचाच पगार कसा द्यायचा? हा प्रश्न सरकारसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे विविध मार्गातून पैसे उभारण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, असेदेखील जयंत पाटील यांनी सांगितले.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील पत्रकार परिषदेत बोलताना..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.