सांगली - पुरोगामी महाराष्ट्रात भाजप जाती-जातीत भेदभाव करण्याचा काम करत आहे, असा आरोप सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केला आहे.
तसेच देशातल्या महागाई प्रश्नावरून दुर्लक्ष करण्यासाठी भावनिक प्रश्न उपस्थित केले जात आहेत,असा आरोपही मंत्री पाटील यांनी करत राज्यातील एनपीएला कोणत्यास्थितीत मुदतवाढ मिळणार नसल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.
भाजप राज्यात जाती-जातीत भेदभाव करण्याचे काम करतंय - सहकारी मंत्री बाळासाहेब पाटील - सांगली सहकारी मंत्री बाळासाहेब पाटील
केंद्रात ज्या वेळी भाजप विरोधात होते, त्यावेळी सिलेंडरचे दर वाढले की महागाईच्या नावाने ओरड करत होते. मात्र, आता प्रचंड महागाई वाढली असताना आता भाजप गप्प आहे. या वाढलेल्या महागाईपासून सामान्य जनतेच्या लक्ष विचलित करण्यासाठी भावनिक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मग तो कर्नाटक राज्यातील हिजाबचा प्रश्न,असो किंवा राज ठाकरे यांचा अजानचा मुद्दा असो,पण आज पुरोगामी महाराष्ट्रात जाती-जातीत भेद करण्याचे काम भाजपाकडुन सुरू असल्याचा आरोप मंत्री पाटील यांनी केला.
भाजपकडून राज्यात जाती-जातीत भेदभाव करण्याचे काम
सांगली - पुरोगामी महाराष्ट्रात भाजप जाती-जातीत भेदभाव करण्याचा काम करत आहे, असा आरोप सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केला आहे.
तसेच देशातल्या महागाई प्रश्नावरून दुर्लक्ष करण्यासाठी भावनिक प्रश्न उपस्थित केले जात आहेत,असा आरोपही मंत्री पाटील यांनी करत राज्यातील एनपीएला कोणत्यास्थितीत मुदतवाढ मिळणार नसल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.
Last Updated : May 8, 2022, 5:29 PM IST