ETV Bharat / state

महाराष्ट्रातील सरकार दिल्लीसमोर कधीही झुकणार नाही - उद्धव ठाकरे - uddhav thackeray criticises central government

केंद्र सरकारची भुमिका राज्याचे पालक अशी असते. मात्र, केंद्र सरकार जर राज्याला मदत देताना नकारघंटा वाजवणार असेल. तर, महाराष्ट्रातील सरकार काही लेचे-पेचे नाही. ते दिल्लीसमोर कधीही झुकणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

Chief Minister Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jan 18, 2020, 7:58 AM IST

सांगली - केंद्र सरकारची भुमिका राज्याचे पालक अशी असते. मात्र, केंद्र सरकार जर राज्याला मदत देताना नकारघंटा वाजवणार असेल. तर, महाराष्ट्रातील सरकार काही लेचे-पेचे नाही. ते दिल्लीसमोर कधीही झुकणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते.

महाराष्ट्राचे सरकार लेचे-पेचे नाही. त्यामुळे मदतसाठी दुजाभाव करणाऱ्या दिल्लीसमोर ते झुकणार नाही, असा इशाराच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकारला दिला आहे. तसेच देशाची अर्थव्यवस्था कोमात गेली असून आधीचेच सरकार बरे होते,अशी टीकाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

कोणत्याही मदतीसाठी महाराष्ट्रातील जनता आणि सरकार दिल्लीसमोर झुकणार नाही, उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबो

हेही वाचा... भारताचे माजी कसोटीपटू बापू नाडकर्णी यांचे निधन

सांगलीच्या इस्लामपूर येथे वाळवा तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते यावेळी नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्यासह इतर अनेक मान्यवर मंडळी व इस्लामपूरकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुमारे 14 कोटी रुपये खर्चून या नव्या इमारतीचे निर्माण करण्यात आले आहे. या सोहळ्याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, जनतेच्या विकासाला आणि त्यांना आधार देण्यासाठी वाळवा तहसील कार्यालय कार्यरत राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

हेही वाचा.... 'निवासी भागात हॉटेल, पब 24 तास सुरू ठेवण्यास विरोध'

यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकार सडकून टीका केली. देशाची अर्थव्यवस्था आज कोमात आहे. देशातील अर्थशास्त्रज्ञ हे देशातील अर्थव्यवस्था कोमात असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे आपण गप्प बसायचं का ? आणि अर्थव्यवस्थेला कोमातुन बाहेर काढण्यासाठी आपण काही केले नाही, तर हे सरकार हवे कशाला ? त्यापेक्षा पहिले सरकार बरे होते, म्हणायची वेळ आली आहे. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

हेही वाचा... 'हे सरकार सूड उगवणारे नाही'; मुख्यमंत्री ठाकरेंचा भाजपला टोला

महाराष्ट्र राज्याला मदत देण्यात केंद्र सरकारकडून दुजाभाव होत असल्याच्या बाबतीत बोलताना, जयंत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या एकमेकांच्या घट्ट मैत्रीचा उल्लेख उद्व ठाकरेंनी केला, शिवसेना सोबत होती म्हणून भाजपचे खासदार निवडून आले आणि केंद्रात सत्ता आली पण आता राज्यातील जनतेच्या मागण्यांसाठी मदत करताना केंद्र सरकार दुजाभाव करत आहे. मात्र, महाराष्ट्राची जनता आणि महाराष्ट्रात सरकार लेचे-पेचे नाही. ते कोणत्याही मदतीसाठी दिल्लीसमोर अजिबात झुकणार नाही, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

Intro:
File name - mh_sng_01udhav_thakre_on_bjp_vis_01_7203751 - to - mh_sng_01udhav_thakre_on_bjp_vis_01_7203751

स्लग -दिल्ली समोर झुकायला आम्ही लेचे-पेचे नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अँकर - महाराष्ट्राचे सरकार लेचे-पेचे नाही,त्यामुळे मदतसाठी दुजाभाव करणाऱ्या दिल्ली समोर झुकणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा केंद्र सरकारला दिला आहे.तसेच देशाची अर्थव्यवस्था कोम्यात गेली असून आधीच सरकार बरं होतं,अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केली आहे ते सांगलीच्या इस्लामपूर मध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.Body:सांगलीच्या इस्लामपूर येथे वाळवा तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते यावेळी नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न झालं.याप्रसंगी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील गृहराज्यमंत्री सतेज पाटील,कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्यासह मान्यवर मंडळी व इस्लामपूरकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तीन मजली प्रशस्त अशी इमारत या ठिकाणी उभारण्यात आली आहे. सुमारे 14 कोटी रुपये खर्चून या इमारतीचा निर्माण करण्यात आला आहे.या सोहळ्याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ,जनतेच्या विकासाला आणि त्यांना आधार देण्यासाठी वाळवा तहसील कार्यालय कार्यरत राहील,अशी अपेक्षा व्यक्त केली.

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजपा सरकार यावेळी
सडकून टीका केली आहे.देशाची अर्थव्यवस्था आज ही कोमात आहे.आज देशातल्या अर्थशास्त्रज्ञ हे देशातील अर्थव्यवस्था कोम्यात असल्याचे सांगत आहेत.त्यामुळे आपण गप्प बसायचं का ? आणि अर्थव्यवस्थेला कोम्यातुन बाहेर काढण्यासाठी आपण काही केले नाही ,तर हे सरकार हवे कशाला ? त्यापेक्षा पहिले होते ते बरे म्हणायची वेळ आली, अश्या शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.

तसेच महाराष्ट्र राज्याला मदत देण्यात केंद्र सरकारकडून दुजाभाव होत असल्याच्या बाबतीत बोलताना,जयंत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या एकमेकांच्या घट्ट मैत्रीचा उल्लेख करताना,शिवसेना सोबत होती म्हणून भाजपाचे खासदार निवडून आले आणि केंद्रात सत्ता आली.पण आता राज्यातील जनतेच्या मागण्यांसाठी मदत मागताना केंद्र सरकार दुजाभाव करत आहे.पण महाराष्ट्राची जनता आणि महाराष्ट्रात सरकार लेेेचेपे-पेचे नाही
आणि कुुठल्याही मदतीसाठी दिल्ली समोर अजिबात झुकणार नाही, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी भाजपा केंद्र सरकारवर केला आहे.

त्याच बरोबर ठाकरे यांनी बोलताना बर वाटलं ,आमचं नातं तुटलं. तो आता भाग नाही,पण नवे सहकारी मजबूत मिळाले आहेत.आणि क्रिकेट मध्ये जसं वेगवेगळ्या देशातील एक जण घेतला जातो ,तशी माझी माणसं आहेत,आणि असा माझा संघ आहे.व संघ म्हणजे टीम असून संघ म्हणजे तो अर्थ काढू नका,आता मला त्या फंदात आणि वादात पडायचे नाही आहे. आणि इतिहासावरून सुरु असलेली लढा आता थांबवूया व इतिहासाचा वारसा पुढे नेऊन, नवा महाराष्ट्र घडवूया,असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.