सांगली : जत तालुक्यातील उमराणी येथील अक्षता काडाप्पा राचगोंड (वय 30 वर्ष) या विवाहितेने शुक्रवारी रात्री विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना (Married woman suicide by drinking poison) घडली. मात्र ही आत्महत्या कोणत्या कारणातून केले, हे समजू शकले नाही या घटनेची जत पोलिसात नोंद झाली (suicide in Sangali) आहे.
कीटकनाशक पिऊन आत्महत्या : जत पोलिसांच्याकडून मिळालेली अधिक माहिती, अशी काडाप्पा रचगोंड हे पत्नी अक्षता, मुलगी विजयालक्ष्मी, अंजली व मुलगा मल्लिकार्जुन व आईसह उमराणी पासून तीन किमी अंतरावरील बसरगी रस्त्या लगत असणाऱ्या आपल्या मळ्यात राहत होते. काडाप्पा हे जत येथील एका शाळेत शिक्षक म्हणून काम करत आहेत. शुक्रवारी संध्याकाळी काडाप्पा व पत्नी अक्षता यांच्यात दोघात भांडण झाल्याने रागाच्या भरात द्राक्षबागेसांठी आणून ठेवलेले कीटकनाशक पिऊन अक्षताने आत्महत्या (Married Woman Suicide) केली.
आत्महत्याचे कारण अस्पष्ट : अक्षताला उपचारासाठी जत येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी सरकारी दवाखान्यात आणण्यात आले, त्यावेळी अक्षता हिला मृत घोषित करण्यात आले. अक्षताचे माहेर तिकोटा असून त्यांचा विवाह काडाप्पा यांच्यासोबत दहा वर्षांपूर्वी झाला होता. आत्महत्याचे अद्याप नेमके कारण समजू शकले नसून अधिक तपास जत पोलीस करीत (woman suicide in Sangali) आहेत.