ETV Bharat / state

Gunaratna Sadavarte : मिरजमध्ये गुणरत्न सदावर्तेंविरोधात मराठा क्रांती मोर्चाकडून तक्रार दाखल

author img

By

Published : Apr 22, 2022, 7:03 PM IST

Updated : Apr 22, 2022, 7:14 PM IST

गुणरत्न सदावर्ते ( Gunaratna Sadavarte ) यांच्याकडून मराठा समाजाबद्दल बदनामी ( Defamatory statements about Maratha community ) आणि प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे गुन्हा नोंद झाल्यास सदावर्ते यांच्या तुरुंगातील मुक्काम वाढणार आहे. मुंबई, सातारा आणि सध्या कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या सदावर्ते यांच्यावर आता मिरजेमध्ये देखील गुन्हा दाखल ( Complaint of Maratha Kranti Morcha for filing case in Miraj ) करण्याची मागणी करण्यात आली आहे.

गुणरत्न सदावर्ते संग्रहित छायाचित्र
गुणरत्न सदावर्ते संग्रहित छायाचित्र

सांगली - सध्या तुरुंगात असणारे गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याचा शक्यता आहे. मिरजमध्ये सदावर्ते यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाकडून तक्रार दाखल झाली आहे. गुणरत्न सदावर्ते ( Gunaratna Sadavarte ) यांच्याकडून मराठा समाजाबद्दल बदनामी ( Defamatory statements about Maratha community ) आणि प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे गुन्हा नोंद झाल्यास सदावर्ते यांच्या तुरुंगातील मुक्काम वाढणार आहे. मुंबई, सातारा आणि सध्या कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या सदावर्ते यांच्यावर आता मिरजेमध्ये देखील गुन्हा दाखल ( Complaint of Maratha Kranti Morcha for filing case in Miraj ) करण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार ( NCP leader Sharad Pawar House Attack ) यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांच्या हल्ल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा सुरू आहे.

प्रतिक्रिया देताना मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक

मराठा क्रांतीकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी : गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात मराठा समाजाच्या भावना दुखावल्याबाबत तक्रार दाखल झाली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलास देसाई यांनी ही तक्रार दाखल केली आहेत. 2021 मध्ये मराठा समाजाच्या बाबतीत गुणवर्ते सदावर्ते यांनी केलेले आक्षेपार्ह विधान, सध्या यूट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. सदावर्ते यांचे विधान आरक्षणासाठी लढणाऱ्या मराठा समाजाची भावना दुखवून, बदनामी करणार आहे. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात समाजद्रोह आणि देशद्रोह गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली आहे. सध्या कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात असणारे गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणार का ? याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.

हेही वाचा - Custody Of Nawab Malik : मलिकांची न्यायालयीन कोठडी वाढली, सर्वोच्च न्यायलयाचाही झटका

Last Updated : Apr 22, 2022, 7:14 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.