ETV Bharat / state

मास्क न वापरणाऱ्या 79 जणांवर दंडात्मक कारवाई

author img

By

Published : Jul 2, 2020, 7:06 AM IST

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क घालणे गरजेचे आहे. मात्र, काही लोक याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मास्क न वापरणाऱ्यावर महापालिकेकडून धडक कारवाई केली जात आहे.

सांगली कोरोना अपडेट
सांगली कोरोना अपडेट

सांगली - महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण वाढले असून परिस्थिती चिंताजनक आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क घालणे गरजेचे आहे. मात्र, काही लोक याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मास्क न वापरणाऱ्यावर महापालिकेकडून धडक कारवाई केली जात आहे.

विना मास्क व्यवसाय करणाऱ्या 79 जणांवर मनपाच्या पथकाने कारवाई करत त्यांच्याकडून 7 हजार 900 इतका दंड वसूल केला आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सुचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. सर्व व्यक्ती ह्या कोणत्याही कारणास्तव सार्वजनिक ठिकाणी जसे की रस्ता, रुग्णालय, कार्यालय, बाजारपेठ, इत्यादी ठिकाणी जात असल्यास मास्क परिधान करणे अनिवार्य आहे.

सांगली-मिरज आणि कुपवाड शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असताना शहरात व्यवसाय करणारे विक्रते हे कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे उल्लंघन करीत असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये रस्त्यावर व्यवसाय करणारे अनेक विक्रेते-ग्राहक हे मास्क वापरत नसल्याचे निदर्शन आले होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये, या उद्देशाने मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी मास्क न वापरणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते.

त्यानुसार सहायक आयुक्त सहदेव कावडे, सावता खरात यांच्या पथकाने विविध ठिकाणी कारवाई केली आहे. यामध्ये 79 जणांवर मास्क न वापरल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत स्वच्छता निरीक्षक एबी सूर्यगंध, अतुल आठवले अंजली कुदळे , स्वछता निरीक्षक धनंजय कांबळे , किशोर कांबळे, गणेश माळी, वैभव कुदळे, प्रणिल माने आदींनी सहभाग घेतला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.