ETV Bharat / state

Sangli Bailgada Sharyat: थार गाडीसाठी बैलगाडी शर्यतींचा पार पडला थरार; बकासुर आणि महीब्याने पटकावली थार - बैलगाडी शर्यतीचे आयोजन

सांगलीच्या भाळवणी येथील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीमध्ये थार गाडी कोण जिंकणार, याकडे लाखो बैलगाडी शौकिनांच्या नजर लागून राहिल्या होत्या. वेगवेगळ्या गटातून पार पडलेले शर्यतीनंतर चुरशीच्या अंतीम सामन्यात पुण्याच्या मुळीशी येथील मोहिल शेठ धुमाळ यांच्या बकासुर आणि कराड रेठरेच्या सदाशिव कदम यांच्या महिब्या बैलजोडीने मैदान मारत थार गाडी पटकावली आहे.

Sangli Bailgada Sharyat:
बैलगाडी शर्यतींचा पार पडला थरार
author img

By

Published : Apr 10, 2023, 9:51 AM IST

सांगली: लाखो बैलगाडी शौकनींच्या उपस्थितीत सांगलीच्या भाळवणी येथे बैलगाडी शर्यतीचा थरार पार पडला. देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीमध्ये पुण्याच्या बकासुर व कराडच्या महीब्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावत थार गाडी जिंकली आहे. अभूतपूर्व उत्साहात आणि थरारक अश्या या बैलगाडी शर्यती पार पडल्या.

200 बैलगाडी स्पर्धेक सहभागी: डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशनच्या वतीने सांगलीच्या विटा नजीकच्या भाळवणी येथे रुस्तूम-ए-हिंद बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 10 एकर परिसरातील माळारानावर ऐतिहासिक बैलगाडी स्पर्धा पार पडल्या. ज्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, सातारा, मुंबई आणि कर्नाटक राज्यातून सुमारे 200 बैलगाडी स्पर्धेक सहभागी झाले होते.

बकासुर आणि महीब्याने पटकावली थार: देशातील सगळ्यात मोठया बैलगाडी शर्यती पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने बैलगाडी शौकीनांनी हजेरी लावली होती. तसेच या बैलगाडी शर्यत मैदानासाठी साताराचे खासदार श्रीनिवास पाटील, खासदार संजय काका पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार निलेश लंके, माजी आमदार पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदि मान्यवरांनीही उपस्थितीत लावली होती. तर देशातील सगळ्या मोठय बैलगाडी शर्यतीमध्ये थार गाडी कोण जिंकणार याकडे लाखो बैलगाडी शौकिनांच्या नजर लागून राहिल्या होत्या. वेगवेगळ्या गटातून पार पडलेले शर्यतीनंतर चुरशीची अंतीम सामन्यात पुण्याच्या मुळीशी येथील मोहिल शेठ धुमाळ, यांच्या बकासुर आणि कराडच्या सदाशिव कदम यांच्या महीब्या बैलजोडीने मैदान मारत, थार गाडी पटकावली आहे.

जीवन देडगे बैलजोडीला द्वितीय क्रमांक : या विजयानंतर बैलागाडी शौकिनांनी मैदानात एकच जल्लोष केला. तर थरारक अश्या पार पडलेल्या शर्यतींमध्ये पुण्याच्या वाघोलो येथील सुमित भाडळे,अमित भाडळे व आदिक घाडगे यांच्या शंभू आणि नांदेड सिटी पुण्याच्या जीवन देडगे यांच्या रोमन बैलजोडीने द्वितीय क्रमांक तर डोंबिवली येथील गुडीरतन म्हात्रे यांच्या बैल जोडीने तिसरा क्रमांक मिळवत ट्रॅक्टर पटकावली आहे. त्यासोबत इतर सात विजेत्यांना दुचाकी बक्षीसे पटकावली आहेत, या विजेत्यांना खासदार श्रीनिवास पाटील महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या हस्ते थार गाडी व दुचाकी देऊन गौरविण्यात आले.

हेही वाचा: Tree Falling On Temple मंदिरावरील पत्र्यावर कोसळले झाड 7 भाविकांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.