सांगली - ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर (Maharashtra-Karnataka State Border) कर्नाटक सरकारकडून कडक निर्बंध (Maharashtra to Karnataka Travel Restrictions) लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये प्रवेश करताना RT-PCR टेस्ट सक्तीची (Karnataka Travel RTPCR Test Need) करण्यात आली आहे. बंगळुरु येथे ओमायक्रॉन रुग्ण (Omicron Patient in Karnataka) आढळल्यानंतर कर्नाटक प्रशासन हायअलर्टवर आहे. त्यामुळे कोरोना टेस्ट शिवाय कोणत्याही प्रवाशांना कर्नाटक राज्यात प्रवेश देण्यात येत नाही.
- महाराष्ट्रात खुलेआम प्रवेश -
सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या म्हैसाळजवळ असणाऱ्या कर्नाटकच्या कागवाड सीमेवर कर्नाटक प्रशासनाकडून चेक पोस्ट सुरू आहे. मात्र, दुसर्या बाजूला कर्नाटकमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांबाबतीत कोणत्याही उपाययोजना नसल्याचे (Karnataka to Maharashtra Travel Restrictions) धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे.
- महाराष्ट्रात येण्यासाठी कोणतीही तपासणी नाही -
महाराष्ट्राच्या हद्दीत महाराष्ट्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची चेक पोस्ट किंवा कोरोना तपासणी करण्यात येत नाही. त्यामुळे कर्नाटकमधून खुलेआमपणे प्रवासी महाराष्ट्रात प्रवेश करत आहेत. त्यामुळे कर्माटकामधील ओमायक्रॉंन व्हायरस यामार्गे महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.