सांगली - वाळवा तालुक्यात दुपारी अवकाळी पाऊस पडला. पावसामुळे तालुक्यातील गहू पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.
वाळवा तालुक्यात सध्या गहू काढणीचा हंगाम सुरु असून सकाळपासूनच उष्ण्ता वाढल्याने अंगाची लाही लाही झाली होती. दुपारी तीनच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पडलेल्या पाऊसामुळे हातातोंडाला आलेले गहू पीक खराब होते की काय असे वाटू लागले आहे. अर्धा तास पडलेल्या पाऊसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाला आहे.