ETV Bharat / state

कृष्णेच्या पाणी पातळीत एका दिवसात 14 फुटांनी वाढ, 35 फुटांपर्यंत वाढ होण्याची शक्यता - flood situation in Sangli

गुरुवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत कृष्णा नदीची पाण्याची पातळी 27 फुटांपर्यंत पोहोचली होती. तर शुक्रवारी कोयना धरणातून करण्यात येणारा विसर्ग आणि संततधार पाऊस यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कृष्णेच्या पाणी पातळीत एका दिवसात 14 फुटांनी वाढ

author img

By

Published : Jul 22, 2021, 11:13 PM IST

सांगली - कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस कायम आहे. त्यामुळे सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. एका दिवसात तब्बल 14 फूट पाणी पातळी वाढली आहे.

गुरुवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत कृष्णा नदीची पाण्याची पातळी 27 फुटांपर्यंत पोहोचली होती. तर शुक्रवारी कोयना धरणातून करण्यात येणारा विसर्ग आणि संततधार पाऊस यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन, पूर परिस्थितीत सर्वतोपरीची मदत करण्याचे आश्वासन

35 फुटांपर्यंत वाढ होण्याची शक्यता..

गेल्या तीन दिवसांपासून सांगली जिल्ह्यात आणि विशेषता कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात मध्ये पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाण्याची पातळी ही नऊ फुटांपर्यंत होते. मात्र, गुरुवारी सकाळपासून पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. गुरुवारी सकाळी कृष्णा नदीची पाण्याची पातळी 13 फूट इतकी होती. मात्र सायंकाळी सात वाजेपर्यंत यामध्ये झपाट्याने वाढ होऊन पाण्याची पातळी 27 फुटांपर्यंत पोहोचली. तर दुसऱ्या बाजूला कोयना धरणातून शुक्रवारी 10 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळी मध्ये आणखी वाढ होणार आहे. पाण्याची पातळी 35 फुटांपर्यंत शुक्रवारी पाण्याची पातळी जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे कृष्णा नदी काठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा-चिपळूण एसटी स्टँड परिसर पाण्याखाली, कधी नव्हे एवढं पुराचं पाणी...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.