ETV Bharat / state

कृष्णा नदी 'प्रदुषण मुक्त' अभियानाला सुरुवात

अखेर सांगली महापालिकेने जिल्ह्याची जीवनदायिनी असणाऱ्या कृष्णा नदीच्या प्रदूषणमुक्तीचा संकल्प करत नदी स्वच्छतेच्या मोहिमेला सुरुवात केली आहे.

author img

By

Published : Feb 8, 2019, 7:58 PM IST

sangali

सांगली - अखेर सांगली महापालिकेने जिल्ह्याची जीवनदायिनी असणाऱ्या कृष्णा नदीच्या प्रदूषणमुक्तीचा संकल्प करत नदी स्वच्छतेच्या मोहिमेला सुरुवात केली आहे. येत्या अडीच वर्षात कृष्णा नदी प्रदूषणमुक्त करण्याचा निर्धार यानिमित्ताने करण्यात आला आहे. कृष्णेच्या स्वच्छतेचा शुभारंभ'संथ वाहते कृष्णामाई' अशी ओळख असणाऱ्या कृष्णा नदीची अवस्था गेल्या काही वर्षात फार भयानक बनली आहे. 'स्वच्छ व निर्मळ' समजल्या जाणाऱ्या कृष्णा नदी पात्रात मिसळणारे मैल मिश्रित पाणी, कारखान्यांचे दुषित पाणी आणि विविध कारणांनी कृष्णा नदीला अक्षरशः गटार गंगेचे रूप प्राप्त झाले आहे. शेरी नाल्यामुळे कृष्णेचे पात्र नेहमीच प्रदुषित राहिले आहे.

कृष्णेच्या स्वच्छतेचा शुभारंभ
अनेक सामाजिक संघटनांनी याविरोधात अनेकवेळा आवाज उठवला आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी कृष्णेच्या प्रदुषणाची गंभीर दखल घेत सर्व संबंधितांना विशेषतः पालिका प्रशासनाला कडक कारवाईचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप आणि पालिका प्रशासनाने अखेर कृष्णा नदी प्रदूषण मुक्तीचा निर्धार केला. सांगली महापालिकेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून कृष्णेच्या स्वच्छतेचा शुभारंभ केला आहे. या स्वच्छता मोहिमेत महापौर संगीता खोत यांच्यासह महिला नगरसेवकांनी नदी पात्रात उतरून कचरा गोळा केला. या मोहिमेत महापालिकेचे सर्व पदाधिकारी तसेच कर्मचारी आणि अधिकारी यांनीही सहभाग घेत कृष्णा प्रदूषणमुक्त अभियानाची सुरुवात केली आहे. या मोहिमेत अर्धा टन कचरा आणि निर्माल्य यावेळी कृष्णा नदीच्या पात्रातून काढण्यात आले आहे. यासाठी महापालिकेने येणाऱ्या बजेटमध्ये कृष्णा प्रदूषण मुक्त अभियानासाठी भरीव निधी धरला असून पुढील अडीच वर्षात सर्व नदीपात्र प्रदूषणमुक्त करण्याचा मानस महापौरांनी व्यक्त केला आहे.
undefined

Intro:सरफराज सनदी - सांगली .

Feed send - FILE NAME - R_MH_1_SNG_08_FEB_2019_KRUSHNA_PRADUSHAN_MUKT_MOHIM_SARFARAJ_SANADI - TO - R_MH_8_SNG_08_FEB_2019_KRUSHNA_PRADUSHAN_MUKT_MOHIM_SARFARAJ_SANADI

स्लग - अखेर कृष्णा नदी प्रदूषण मुक्त अभियानाला सुरवात,अडीच वर्षात कृष्णा प्रदूषणमुक्त करण्याचा महापालिकेचा संकल्प..

अँकर - अखेर सांगली महापालिकेने जिल्ह्याची जीवनदायिनी असणाऱ्या कृष्णा नदीच्या प्रदूषण मुक्तीचा संकल्प करत नदी स्वच्छतेच्या मोहिमेला सुरवात केली आहे.येत्या अडीच वर्षात कृष्णा नदी प्रदूषण मुक्तचा निर्धार यानिमित्ताने करण्यात आला आहेBody:व्ही वो - "संथ वाहते कृष्णामाई"अशी ओळख असणाऱ्या कृष्णा नदीची अवस्था गेल्या काही वर्षात फार भयानक बनली आहे.'स्वच्छ व निर्मळ' समजल्या जाणाऱ्या कृष्णा नदी पात्रात मिसळणारे मैल मिश्रीत पाणी,कारखान्यांनाचे दूषित पाणी आणि विविध कारणांनी कृष्णा नदीचे अक्षरशः गटार गंगेचे रूप प्राप्त झाले आहे.तर सांगली महापालिकेच्या भोंगळ कारभाराने यामध्ये नेहमीच भर घालण्याचे काम केले.शेरीनाल्यामुळे कृष्णेचे पात्र नेहमीच प्रदूषित राहिले आहे.अनेक सामाजिक संघटनांनी याविरोधात अनेक वेळा आवाज उठवला.
यामुळे अनेकवेळा नामधारी प्रदूषण महामंडळाकडून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारत केवळ पैसे उकळण्याचे काम केले.आणि पालिकेने प्रदूषनाला आळा घालण्यापेक्षा कोट्यवधी रुपयांचा दंड भरून कातडी वाचवण्याचे काम केले.पण या सगळयात कृष्णेच्या प्रदूषणाचा प्रश्न तसाच राहिला.

आता सांगली महापालिकेच्या प्रशासनाला खडबडून जाग आली आहे.
कारण काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकार्यांनी कृष्णेच्या प्रदूषणाबाबत गंभीर दखल घेत,सर्व संबंधितांना विशेषतः पालिका प्रशासनाला कडक कारवाईचा इशारा दिला होता.आणि या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपा आणि पालिका प्रशासनाने अखेर कृष्णा नदी प्रदूषण मुक्तीचा निर्धार केला आहे.सांगली महापालिकेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून कृष्णेच्या स्वच्छतेचा शुभारंभ केला आहे.या स्वच्छता मोहिमेत महापौर संगीता खोत यांच्यासह महिला नगरसेवकांनी नदी पात्रात उतरून कचरा गोळा केला.या मोहिमेत महापालिकेचे सर्व पदाधिकारी तसेच कर्मचारी आणि अधिकारी यांनीही सहभाग घेत कृष्णा प्रदूषणमुक्त अभियानाची सुरवात केली आहे. या मोहिमेत अर्धा टन कचरा आणि निर्माल्य यावेळी कृष्णा नदीच्या पात्रातून काढण्यात आले आहे.यासाठी महापालिकेने येणाऱ्या बजेटमध्ये कृष्णा प्रदूषण मुक्त अभियानासाठी भरीव निधी धरला असून पुढील अडीच वर्षात सर्व नदी पात्र प्रदूषणमुक्त करण्याचा मानस महापौरांनी व्यक्त केला आहे.

बाईट: सौ संगीता खोत,महापौर.

व्हीवो: कृष्णा नदी प्रदूषण मुक्तीसाठी भाजपाचे सर्व नगरसेवक उद्यापासून कृष्णा नदीच्या पुलावर निर्माल्य नदीत टाकणाऱ्याना गांधीगिरी पद्धतीने फुले देऊन प्रबोधनाची मोहीम हाती घेऊन, जनतेला नदी पात्रात निर्माल्य न टाकनेचे आवाहनही करणार आहेत.यामुळे कृष्णा नदी प्रदूषणमुक्त करण्याची मोहीमच आता सुरू झाली आहे.

बाईट: शेखर इनामदार, नेते ,भाजपा.

बाईट: मौसमी बर्डे, उपायुक्त, सांगली मनपा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.