सांगली - चंदन तस्कर करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. कवठेमहांकाळमध्ये तीन चंदन तस्करांना जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून 1 लाख 42 हजार रूपयांचे चंदन जप्त करण्यात आले आहे. कवठेमंकाळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
चंदन तस्करी करणाऱ्या तिघांना अटक कवठेमहांकाळ तालुक्यातील घोरपडी- जुनोनी रोडवर चंदन तस्करीसाठी काही लोक येणार असल्याची माहिती कवठेमहांकाळ पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून चंदनाची तस्करी करण्यासाठी आलेल्या संशयित तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चंदनाची ओंडकी आढळून आली. यानंतर पोलिसांनी त्यांचाकडील 1 लाख 42 हजार रूपये चंदनासह 2 मोटारसायकल जप्त केल्या. दरिबा बजबळकर, विकास माने आणि संतोष माने यांना अटक करण्यात आली. तिघेही सोलापूरच्या सांगोला येथील असल्याचे समजते आहे.हेही वाचा - कॅन्सरग्रस्त चार वर्षीय 'परी'ने जिंकली कोरोना विरुद्धची लढाई
हेही वाचा - मदतीचा हात... 'दागिने विका, दागिने घरात राहून डबल होणार नाहीत', मुंंबईचा ऑक्सिजनमॅन