सांगली - प्रसिद्ध उद्योगपती आणि चितळे उद्योग समूहाचे संचालक काकासाहेब चितळे यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. वयाच्या 79 व्या वर्षी मिरज येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हेही वाचा - सिपना नदीचे खळखळणारे पाणी, निसर्गाच्या सौंदर्याची उधळण अन् कोलकास विश्रामगृह...
शुक्रवारी रात्री चितळे यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना मिरजेच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना शनिवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
सांगली जिल्ह्यातील भिलवडी हे काकासाहेब चितळे यांचे मूळ गाव, याठिकाणाहून चितळे बंधूंनी आपल्या उद्योगाची सुरुवात केली आणि आज जगभर त्यांची विविध उत्पादने पोहचली आहेत. दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि भाकरवडी हे चितळेंची प्रसिद्ध उत्पादने आहेत.