ETV Bharat / state

जयंत पाटलांनी दहा जणांच्या लसीचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीत केला जमा - सांगली लसीकरण

राज्याचे जलसंपदा व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी लसीकरण करून घेतले आहे. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री जयंत पाटील यांनी सांगली मध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून लसीचा पहिला डोस घेतला.

जयंत पाटील
जयंत पाटील
author img

By

Published : May 1, 2021, 9:13 PM IST

सांगली - महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लसीकरण करून घेतले आहे. सांगलीमध्ये पाटील यांनी लसीचा पहिला डोस घेत त्यांच्यासह दहा जणांच्या लसीचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केले आहेत.

राज्याचे जलसंपदा व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी लसीकरण करून घेतले आहे. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री जयंत पाटील यांनी सांगलीमध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून लसीचा पहिला डोस घेतला. यानंतर पाटील म्हणाले, “लस अगदी सुरक्षित आहे, त्यामुळे प्रत्येकाने शासनाच्या नियमानुसार लस घ्यावी तसेच रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होत आहे, आणि परिस्थिती आटोक्यात येत आहे. कोरोना मुक्तीकडे वाटचाल करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरेल" असा विश्वासही मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.

स्वतःसह दहा जणांच्या लसीचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा

मंत्री जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्र सरकारला मदतीचा हातभार लावण्यासाठी #Citizens4Maharashtra ही मोहीम सुरू केली आहे. ज्यामध्ये लस घेणाऱ्यांना लसीचे पैसे मुख्यमंत्री साहाय्यता निधीला जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अभियानाचे कौतुक करत मंत्री पाटील यांनी#Citizens4Maharashtra या मोहिमेत आपला सहभाग नोंदवत आपल्या लसीच्या खर्चासह दहा जणांच्या लसीचे पैसे मुख्यमंत्री सहायता निधीला मदत म्हणून दिली .

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.