सांगली - नारायण राणे यांनी महाविकास आघाडीवर केलेल्या टिकेवरून राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी राणे यांना टोला लगावला आहे. राणे यांचे फारसे मनावर घेऊ नये, नारायण राणे हेच काही दिवसात महाविकास आघाडी सरकारचे गतिमान सरकार म्हणून कौतुक करतील, असा टोला पाटील यांनी लगावला. ते इस्लामपूरच्या कासेगाव येथे बोलत होते.
हेही वाचा - लुटमार करत दोन महिलांचा खून केल्याप्रकरणी एकाला जन्मठेप
भाजपचे नेते नारायण राणे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका करत महाविकास आघाडी सरकार म्हणजे स्थगिती सरकार आहे. ते फार काळ टिकणार नाही. या सरकारने विकास कामांना थांबवले, असल्याची टीका केली होती.