ETV Bharat / state

Sangli News: कृष्णेचे पाणी घेऊन मुख्यमंत्र्यांचे दुष्काळ शिष्टमंडळ भेटीला; कुठलाही प्रश्न शिल्लक ठेवणार नसल्याचे दिले आश्वासन

Sangli News: जत तालुक्यातल्या 42 गावांचा पाण्याचा प्रश्न आता चांगलाचं पेटला आहे. पाणी देताय का ? कर्नाटकात पाठवताय ? ही भूमिका घेऊन दुष्काळी जतचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी सांगली मधून मुंबईकडे रवाना झाले आहे. सांगलीच्या कृष्णा नदीतील पाणी कलशमध्ये घेऊन तुकाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली दुष्काळग्रस्तांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा बंगल्याकडे रवाना

कृष्णेचे पाणी घेऊन मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ शिष्टमंडळ भेटीला

author img

By

Published : Nov 30, 2022, 10:45 AM IST

सांगली: जत तालुक्यातल्या 42 गावांचा पाण्याचा प्रश्न आता चांगलाचं पेटला आहे. पाणी देताय का ? कर्नाटकात पाठवताय ? ही भूमिका घेऊन दुष्काळी जतचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी सांगली मधून मुंबईकडे रवाना झाले आहे. सांगलीच्या कृष्णा नदीतील पाणी कलशमध्ये घेऊन तुकाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली दुष्काळग्रस्तांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा बंगल्याकडे रवाना झाले आहे.

शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी: जत तालुक्यातले 42 गावांचा पाण्याचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. कर्नाटकमध्ये जाण्याचा बाबतीत आता गावागावांमध्ये उठाव सुरू झालेला आहे. या गावांनी पाणी देताय का? कर्नाटक मध्ये पाठवताय? असा सवाल करत पाण्यासाठी तीव्र आंदोलन छेडला आहे. पाण्याची मागणी घेऊन दुष्काळग्रस्तांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी थेट मुंबईकडे रवाना झाले आहे. पाणी चळवळीचे प्रणेते तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखालील सांगली शहरातुन कृष्णा नदीपर्यंत पायी यात्रा काढण्यात आली.

कृष्णेचे पाणी घेऊन मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ शिष्टमंडळ भेटीला

शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना: त्यानंतर जत तालुक्यातल्या तलावांमधून संकलित करण्यात आलेल्या पाणी कृष्णा नदीच्या पात्रामध्ये विसर्जित करण्यात आले. आणि कृष्णा नदीचे पाणी हे कलशमध्ये भरून घेण्यात आले आहे. हे पाण्याचा कलश घेऊन तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखालील दुष्काळग्रस्तांचे शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर बुधवारी सकाळी शिष्टमंडळ पोहचणार आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटत नाहीत आणि आपलं प्रश्न जाणून घेत नाही. तोपर्यंत शिष्टमंडळ वर्षा बंगल्यासमोर ठिय्या मारणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या भेटीपर्यंत तुकाराम महाराजांनी अन्न व पाणी त्यागी केला आहे.

जतचा कुठलाही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही: कर्नाटकचे मुख्यमंत्री, माजीमंत्री यांनी जतवर केलेल्या दाव्यानंतर जतेत मोट कल्लोळ माजला आहे. एकीकडे राज्य सरकार जतवर करत असल्याचा अन्यायाच संताप तर दुसरीकडे कर्नाटकच्या समर्थन देण्याचा कल वाढला. यावर राज्य सरकारने तातडीने मार्ग काढावा यासाठी जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी मंगळवारी तातडीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आमदार सावंत यांना जतचा कुठलाही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही. सर्व विभागांची माहीती मागवून घेत आहोत. विस्तारीत योजनेची प्रक्रीया जानेवारीत सुरू करण्याचे ठोस आश्वासन दिले आहे.

दबावगट मोठ्या प्रमाणात: गेल्या 8 दिवसापासून जतेत कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. दोन्ही बाजूंनी हा संताप आहे. एकतर आमचे सरकार विकासात अन्याय करते आहे. मग कर्नाटकात का जावू नये असा दबावगट मोठ्या प्रमाणात तयार होतो आहे. यामुळे तालुक्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. पाणी संघर्ष समितीने तर 8 दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. तर तुकाराम बाबा महाराज यांच्या मुंबई दौऱ्याला सांगलीतच रोखण्यात आले आहे.

अंतिम छाननी पुण्यात सुरू: या साऱ्या परिस्थितीवर जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी तातडीने मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून सविस्तर चर्चा केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी जतच्या वंचित ६५ गावांसाठी विस्तारीत योजनेचे काम जानेवारीत सुरू करण्यात येईल. या योजनेची अंतिम छाननी पुण्यात सुरू आहे, तिचा अहवाल मंत्रीमंडळा समोर येताच, त्यास अंतीम मंजुरी देण्यात येईल. हा सगळा विषय डिसेंबर अखेर पर्यंत पूर्ण करून प्रत्यक्ष जानेवारीत याची निवीदा प्रक्रीया सुरू करण्यात येईल, असे आश्वासन करण्यात आले आहे.

अधिकचा निधी देण्याची विनंती: यावेळी आमदार सावंत यांनी जतची वस्तुस्थिती सांगून राज्य सरकारने विस्तारीत योजना पूर्ण होईपर्यंत तुबची योजनेसाठी कर्नाटक महाराष्ट्र यांच्यात सांमजस्य करार करावा, जेणेकरून तोवर पूर्व भागाला पाणी मिळेल. तसेच जतच्या विकासाला अधिकचा निधी देण्याची विनंती केली. यात विशेषता आपण तालुक्यातील रिक्त पदे आणि रस्त्यांच्या अनुशेषासाठी जवळपास शंभर कोटींचा निधी दयावा अशी मागणी केली आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी आपण जत तालुक्या विषयी सर्वांना बोलावून स्वतंत्र बैठक घेवू असे आमदार विक्रमसिंह सावंत MLA Vikram Singh Sawant यांना सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.