ETV Bharat / state

Krishna River कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ एनडीआरएफची दोन पथके दाखल - कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली increased in flood level krishna river आहे. त्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफचे दोन पथके तैनात करण्यात आली krishna river 2 team ndrf deployed आहे.

Krishna River
Krishna River
author img

By

Published : Aug 12, 2022, 8:45 PM IST

सांगली - कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे कृष्णा नदीचे पाणी औदुंबर येथील दत्त मंदिरामध्ये शिरले increased in flood level krishna river आहे. मंदिर पाण्यात असून, कमरे ऐवढ्या पाण्यातून पुजा-अर्चा केली जात आहे. तर, कृष्णाच्या पाणी पातळीत आणखी वाढ झाल्यास मंदिर पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफचे दोन पथके तैनात करण्यात आली krishna river 2 team ndrf deployed आहे.

सारंग कुरवा प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

हे एनडीआरएफचे पथके सांगली शहरांमध्ये आणि आष्टा या ठिकाणी हे पथक कार्यरत असणार आहेत. सांगलीच्या कृष्णा नदीची पाण्याची पातळी 30 फुटांवर पोहोचली आहे. कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्याची खबरदारी म्हणून प्रशासनाकडून एनडीआरएफ पथकांना पाचारण करण्यात आले आहे.

नदी पाणलोट क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. कृष्णा नदी पात्र बाहेर पडली आहे, त्यामुळे पलूस तालुक्यातल्या औदुंबर येथील दत्त मंदिर येथे पाणी शिरले आहे. जवळपास दत्त मंदिर बुडाला असून या ठिकाणी भाविकांचे दर्शन बंद झाले आहे. मात्र, मंदिरातील मोजक्या पुजाऱ्यांच्याकडून या कमरे एवढ्या पाण्यातूनच नियमित केली जाणारी पूजा करण्यात येत आहे.

तर, सांगलीच्या आयर्विन पूल या ठिकाणी पाण्याची पातळी 29 फुटांवर पोहचली आहे. दोन दिवसांत तब्बल 19 फुटाने पाणी पातळी वाढल्याने कृष्णाकाठी भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यामध्ये एनडीआरएफचे दोन पथके दाखल झाली आहेत. एका पथकात 40 जवानांचा समावेश असून, एक पथक वारणा आणि कृष्णा नदीचा मध्य भागी असणाऱ्या आष्टा तर एक पथक सांगली शहरात तैनात झाले आहे.

या पथकाकडून कृष्णा नदीची पाहणीही करण्यात आली. खबरदारी म्हणून हे पथक दाखल झाली असून, कोयना धनातून दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 35 फुटांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, पूर परिस्थिती निर्माण होणार नसल्याचे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. तरी देखील कृष्णाकाठच्या गावांनी सतर्क रहावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - भाजपात खांदेपालट प्रदेशाध्यक्षपदी Chandrashekhar Bawankule तर मुंबई अध्यक्षपदी आक्रमक मराठा चेहरा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.