ETV Bharat / state

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; वाळवा तालुक्यातील घटना

author img

By

Published : May 18, 2021, 10:32 PM IST

वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील एका विवाहितेने आज गळफास घेऊन आत्महत्या केली. विवाहितेने तिच्या पतीच्या घरी आत्महत्या केली. ही घटना सकाळच्या सुमारास घडली. सारिका संतोष पाटील (वय ३६) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. या घटनेची तक्रार रुपेश दिलीप पाटील यांनी कुरळप पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

kuralap police
kuralap police

सांगली - वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील एका विवाहितेने आज गळफास घेऊन आत्महत्या केली. विवाहितेने तिच्या पतीच्या घरी आत्महत्या केली. ही घटना सकाळच्या सुमारास घडली. सारिका संतोष पाटील (वय ३६) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. या घटनेची तक्रार रुपेश दिलीप पाटील यांनी कुरळप पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

हेही वाचा - तौक्ते चक्रीवादळामुळे सांगली जिल्ह्यातील 32 हेक्टरवरील शेतीचे नुकसान

सारिका यांना आत्महत्या करण्यासाठी किशोर सुभाष पाटील, संस्कृती किशोर पाटील, सुभाष निवृत्ती पाटील, सखुबाई सुभाष पाटील, शिवाजी निवृत्ती पाटील या संशयितांनी प्रवृत्त केले असल्याची तक्रार रुपेश दिलीप पाटील (रा. नाटोली, ता. शिराळा) यांनी दिली आहे.

या घटनेसंबंधी कुरळप पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, सदर संशयित सासरकडील लोकांकडून सारिका यांच्यावर नेहमी जाच केला जात होता. तुझ्या माहेर कडून दागिने घेऊन ये, त्यासाठी लागणारे पैसेही घेऊन ये, पोराचा दवाखाना तुझ्या माहेरच्या लोकांनीच केला पाहिजे, तसेच घरखर्चासाठी पैसेही माहेरच्या लोकांनी दिले पाहिजेत. यासोबतच घरासाठी काढलेले कर्ज भागविण्याकरिता पैसे घेऊन ये, अशा मागणी सतत सारिका यांना तिच्या सासरच्या लोकांकडून केली जात होती. यामुळे सारिका सतत मानसिक तणावाखाली राहत होत्या. या सर्व जाचाला कंटाळून सारिका यांनी आज राहत्या घरी साडीच्या साहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे तक्रारीत म्हंटले आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्यासह सहाय्यक पोलीस फौजदार कुलकर्णी आदी करीत आहेत.

हेही वाचा - 'पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा अध्यादेश मागे घ्या, अन्यथा 25 मेपासून मंत्रालयासमोर ठिय्या'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.