सांगली - पिस्तुल आणि काडतूस विक्री करणाऱ्या एक तरुणास सांगली शहरातून अटक करण्यात आली आहे. स्वप्नील जाधव, असे या तरुणाचे नाव असून त्याच्याकडून गावठी पिस्तुलसह 2 जिवंत कडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
हेही वाचा - मृत पोलिस कुटुंबातील 24 जण अनुकंपा तत्वावर पोलीस दलात दाखल
सांगली शहरातील वसंतदादा मार्केट यार्ड येथील वारणा गॅस कार्यालयासमोर असणाऱ्या वसंतदादा उद्यानाजवळ एक जण पिस्तुल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून स्वप्निल जाधव (वय 24 रा. तिसंगी, ता. कवठेमहांकाळ) याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक 60 हजार किंमतीची गावठी पिस्तुल, तसेच 2 जिवंत काडतुसे आढळलीत. त्यानंतर पोलिसांनी त्याचाकडून 1 पिस्तुल व 2 काडतुसे, असे 60 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यास अटक केली आहे.
हेही वाचा - प्रकाश शेंडगेंनी स्वत:च्या फायद्यासाठी ओबीसी महामेळाव्याची तारीख बदलली, ओबीसी नेत्याची टीका