सांगली- सांगलीत रविवारी पावसाने हाहाकार माजवला आहे. यामध्ये विशेषतः दुष्काळी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे नदी-ओढे नाल्यांना पूर आला आहे. तर या पुरात आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यात 4 जण वाहून गेले आहेत.
सांगली जिल्ह्यात रविवारी ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार केला. या पावसामुळे कडेगाव, खानापूर, आटपाडी, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील ओढे-नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे बहुतांश पूल, बंधारे पाण्याखाली गेले आहेत. अनेक ठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती. तसेच नदी आणि ओढ्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी चार जण वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.
आटपाडी आणि घाटमाथ्यावर ढग फुटी सदृश परिस्थिती निर्माण होऊन तालुक्यातील अग्रणी नदीने रौद्ररूप धारण केले आहे. या अग्रणी नदीच्या पुलावरून रात्री 3 जण वाहून गेले आहेत. करंजे, बलवडी मधील अग्रणी पुलावरून 2 जण आणि लेंगरे येथून एकजण असे एकूण 3 जण वाहून गेले आहेत.
कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग नजीकच्या कवठेमहांकाळ-मोरगाव अग्रणी नदीवरील पुलावरून एक जण वाहून गेला आहे. पुलावरून पाणी वाहत असताना यावेळी चारचाकी गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने गाडी अडकली. गाडीतल्या 9 जणांना पाण्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र यामध्ये दत्ता साबळे हा युवक पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यानंतर आसपासच्या ग्रामस्थांनी रस्सीद्वारे 8 जणांना बाहेर काढण्यात यश मिळवले.
सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस; पुराच्या पाण्यात चार जण वाहून गेले - सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस
सांगली जिल्ह्यात रविवारी पावसाने हाहाकार केला. या पावसामुळे कडेगाव, खानापूर, आटपाडी, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील ओढे-नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे बहुतांश पूल, बंधारे पाण्याखाली गेले आहेत.