ETV Bharat / state

संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्याच्या निषेधार्थ 'शिवप्रतिष्ठान'कडून सांगली बंदची हाक

author img

By

Published : Jan 16, 2020, 4:52 PM IST

खासदार राऊत यांनी अत्यंत निंदनीय वक्तव्य केले आहे. यामुळे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता दुखावली गेली आहे. शुक्रवारी संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून सांगलीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे, असे संभाजी भिडे यांनी सांगितले.

शिवप्रतिष्ठानकडून सांगली बंदची हाक
शिवप्रतिष्ठानकडून सांगली बंदची हाक

सांगली - छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा शिवप्रतिष्ठानकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या विरोधात शिवप्रतिष्ठानकडून शुक्रवारी सांगली जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. शिवप्रतिष्ठानाचे संस्थापक संभाजी भिडे यांनी हा निर्णय घेतला. राऊत यांनी बुधवारी पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा, असे वक्तव्य केले होते.

शिवप्रतिष्ठानकडून सांगली बंदची हाक

खासदार राऊत यांनी अत्यंत निंदनीय वक्तव्य केले आहे. त्यामुळे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता दुखावली गेली आहे. शुक्रवारी संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून सांगलीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे, असे संभाजी भिडे यांनी सांगितले.

हेही वाचा - इंदिरा गांधींबद्दल तथ्यहीन अनादर काँग्रेस खपवून घेणार नाही"

राऊतांच्या या वक्तव्याची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राऊतांकडून खासदारकीचा राजीनामा घ्यावा. अन्यथा, यापुढील काळात संपूर्ण महाराष्ट्रभर शिव प्रतिष्ठानकडून आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा भिडे यांनी दिला आहे. शुक्रवारी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठानने पुकारलेल्या या आंदोलनाकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

Intro:
File name - mh_sng_03_shivpratishthan_sangli_band_hak_vis_01_7203751 - mh_sng_03_shivpratishthan_sangli_band_hak_byt_02_7203751

स्लग - छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी संजय राऊतांच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठानकडून सांगली जिल्हा बंदची हाक ..

अँकर - छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या बद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा
शिवप्रतिष्ठानकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.या विरोधात शिवप्रतिष्ठानकडून उद्या शुक्रवारी सांगली जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. शिवप्रतिष्ठानाचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी ही हाक दिली आहे. खासदार राऊत हिंदी अत्यंत निंदनीय वक्त केला आहे महाराष्ट्राच्या अस्मिता दुखावली गेली आहे.असे मत व्यक्त करत भिडे यांनी शुक्रवारी संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून सांगली कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे सगळे गुरुजी यावेळी स्पष्ट केले आहे तसेच संजय राऊत यांनी व्यक्त के वक्तव्य केले आहे तिची दखल घेऊन शिवसेनेचे नेते व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या खासदारकीचा राजीनामा घ्यावा,अन्यथा यापुढील काळात संपूर्ण महाराष्ट्रभर शिव प्रतिष्ठानकडून आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा संभाजी भिडे यांनी दिला आहे.तर उद्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहणार,असून त्या ठिकाणी त्यांचा जाहीर कार्यक्रम पार पडणार आहे.या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठान पुकारलेल्या या आंदोलनाकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

बाईट - संभाजी भिडे गुरुजी - संस्थापक ,शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान.Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.