ETV Bharat / state

Ganeshotsav 2022 ऐतिहासिक रथोत्सव सोहळ्यातून दीड दिवसाच्या बाप्पांना निरोप

1883 सालापासून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतामध्ये सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरुवात केली पण त्याच्या आधीही 106 वर्षांपूर्वीपासून तासगाव येथे गणेश उत्सव साजरा करण्याची परंपरा होती आणि हीच गणेशोत्सवाची परंपरा आजही कायम आहे.तासगावचे संस्थानिक परशुराम भाऊ पटवर्धन यांनी हे गणेशोत्सवाची परंपरा सुरू केली इतकच नव्हे तर गणेश सिद्धिविनायक मंदिर हेमाडपंथीय पद्धतीने अगदी भव्य दिव्य असं बांधण्यात आलं.येथेच उजव्या सोंडेच्या गणेश मुर्ती आहे.

Breaking News
author img

By

Published : Sep 1, 2022, 10:58 PM IST

सांगली तासगावचा ऐतिहासिक"रथोत्सव सोहळा"अर्थात दीड दिवसाच्या गणेश विसर्जन मिरवणुक प्रचंड जल्लोषात पार पडली आहे.यंदाचा हे 243 वे वर्ष होते. तासगावच्या पटवर्धन संस्थानकडून हा रथोत्सव सोहळा दरवर्षी आयोजित करण्यात येतो,यासाठी तासगाव नगरीसह rathotsav ceremonyराज्याच्या कानाकोपऱ्यातले गणेश भक्त सहभागी झाले होते.

टिळकांच्या अगोदरपासून गणेशोत्सवाची परंपरा सुरू 1883 सालापासून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतामध्ये सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरुवात केली पण त्याच्या आधीही 106 वर्षांपूर्वीपासून तासगाव येथे गणेश उत्सव साजरा करण्याची परंपरा होती आणि हीच गणेशोत्सवाची परंपरा आजही कायम आहे.तासगावचे संस्थानिक परशुराम भाऊ पटवर्धन यांनी हे गणेशोत्सवाची परंपरा सुरू केली इतकच नव्हे तर गणेश सिद्धिविनायक मंदिर हेमाडपंथीय पद्धतीने अगदी भव्य दिव्य असं बांधण्यात आलं.येथेच उजव्या सोंडेच्या गणेश मुर्ती आहे.

दीड दिवसात या बाप्पांना निरोप देण्याची प्रथा गणेशोत्सवामध्ये याठिकाणी गणेश मूर्ती प्रतिष्ठापणा करण्याची परंपरा असून अवघ्या दीड दिवसात या बाप्पांना निरोप देण्याची प्रथा आहे.ही प्रथा ऐतिहासिक मानली जाते,कारण भव्य-दिव्य अशा रथातून दीड दिवसाच्या बाप्पांना निरोप देण्यात येतो.त्यामुळे याला रथोत्सव म्हणून ओळखले जाते.

रथ गणेशभक्त दोरखंडाच्या साह्याने ओढतात रथोत्सव सोहळ्यासाठी जो रथ आहे,तो दगड आणि लाकडांपासून बनलेला आहे. हा रथ गोपूर पद्धतीचा असून ज्याच्यावर हेमाडपंथी छाप पाहायला मिळते,तीस फूट उंचीचा हा पाच मजली रथ आहे.या रथातून दीड दिवसांच्या बाप्पांना जल्लोषात निरोप देण्यात येतो. दीड किलोमीटर पर्यंत हा रथ गणेशभक्त दोरखंडाच्या साह्याने ओढतात. हजारो गणेशभक्त हा रथ ओढण्यासाठी चढाओढ करत असतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे रथोत्सव सोहळ्यामध्ये खंड पडला होता. मात्र यंदाच्या वर्षी अभूतपूर्व अशा उत्साहात आणि जल्लोषाच्या वातावरणात हा रथोत्सव सोहळा पार पडला आहे.

परंपरेप्रमाणे बाप्पांचे विसर्जन गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोशा ,ढोल ताशा पथकांच गजर आणि गुलाल व पेढ्यांची उधळण करत हा रथोत्सव सोहळा संपन्न झाला.या रथोत्सव सोहळ्याला खासदार संजयकाका पाटील,राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर.आर पाटील यांनीही उपस्थिती लावली.गणपती मंदिराच्या अगदी समोरच्या दिशेला असणाऱ्या काशीविश्वेश्वर मंदिरा पर्यंत हा रथ ओढत नेऊन परंपरेप्रमाणे बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.