ETV Bharat / state

"मी समाजाचा शत्रू आहे", कर्फ्यू तोडणाऱ्या महाभागांनी झळकवले फलक - कर्फ्यू तोडणाऱ्या महाभागांनी झळकवले फलकॉ

संचारबंदीतही घराबाहेर फिरणाऱ्यांना अद्दल घडवण्यासाठी सांगलीतील पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली आहे. पोलिसांकडून "मी समाजाचा शत्रू आहे, मी घरी नाही राहणार" अशा आशयाचे फलक बाहेर फिरणाऱ्या नागरिकांच्या हातात देण्यात येत आहेत.

कर्फ्यू तोडणाऱ्या महाभागांनी झळकवले फलक
कर्फ्यू तोडणाऱ्या महाभागांनी झळकवले फलक
author img

By

Published : Mar 24, 2020, 3:12 PM IST

सांगली - संचारबंदीतही घराबाहेर फिरणाऱ्यांना अद्दल घडवण्यासाठी सांगलीतील पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली आहे. पोलिसांकडून "मी समाजाचा शत्रू आहे, मी घरी नाही राहणार" अशा आशयाचे फलक बाहेर फिरणाऱ्या नागरिकांच्या हातात देण्यात येत आहेत. असे पोस्टर हातात घेतलेल्या कुपवाडामधील काही तरुणांचे फोटो व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा - राज्यात संचारबंदी, मात्र नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गर्दीच गर्दी

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू आहे. सांगली जिल्ह्यात चार कोरोना रुग्ण आढळल्यानंतर संचारबंदी तीव्र झाली आहे. मात्र, अशा परिस्थितीतही काही महाभाग रस्त्यावर मुक्तपणे फिरताना पाहायला मिळत आहेत. या महाभागांना शिक्षा म्हणून पोलीस उठाबशा काढायला लावत आहेत.मात्र, तरीही काही लोक विनाकारण रस्त्यावर बिनधास्तपणे वावरत आहेत. त्यामुळे, हतबल झालेल्या पोलिसांनी आता अशा महाभागांना धडा शिकवण्यासाठी वेगळा उपाय शोधून काढला आहे.

कर्फ्यू तोडणाऱ्या महाभागांनी झळकवले फलक
कर्फ्यू तोडणाऱ्या महाभागांनी झळकवले फलक

जे नागरिक, तरुण विनाकारण रस्त्यावरून फिरत आहेत, त्यांना पकडून त्यांच्या हातात "मी समाजाचा शत्रू आहे, मी घरी नाही राहणार" या आशयाचे पोस्टर देण्यात येत आहेत. त्यामुळे, आता विनाकारण फिरणाऱ्या महाभागांना पोलिसांच्या या नव्या शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

कर्फ्यू तोडणाऱ्या महाभागांनी झळकवले फलक
कर्फ्यू तोडणाऱ्या महाभागांनी झळकवले फलक

हेही वाचा - सीमाबंदीमुळे वरुडमध्ये १८ कोटी किमतीच्या ५०० ट्रक संत्रा मंडीत पडून

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.