सांगली: मिरजेत नातेवाईकांच्या घरात डल्ला मारून रोकड घेऊन पसार (stealing lakhs of rupees from a relative house) होणाऱ्या पती पत्नीला अटक (Husband and wife arrest ) करण्यात आली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांसह पाच लाख 17 हजारांचा मुद्देमाल जप्त (Stolen cash and jewelery recovered) करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सांगली (couple steals from a relative's house) शहरा जवळच्या इनामधामणी पळून जाणाऱ्या चोरट्या दांम्पत्यास अटक केली आहे. (Local Crime Investigation Branch Sangli) (Latest news from Sangli) (Sangli Crime)
चोरी करून पसार - मिरज शहरातल्या लक्ष्मी मार्केटच्या किसान चौक येथे घरा शेजारीच राहणाऱ्या नातेवाईकांच्या घरात लाखो रुपयांचा डल्ला मारून चोरीतले रोकड घेऊन पसार होताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पती-पत्नीला जेरबंद केला आहे. सांगली शहरा जवळ असणाऱ्या इनामधामणी येथून चोरीचे पैसे घेऊन पती-पत्नी पसार होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार पथकाने इनामधामणी येथील शांतीबन चौकात थांबलेल्या दोघा पती-पत्नींना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडे रोकड आणि सोन्याचे दागिने आढळून आले. प्राथमिक चौकशी केली असता दोघांच्याकडून उडवा-उडवीची उत्तर देण्यात आली.
चोरीचे दागिने जप्त - सखोल चौकशी केली असता दोघांनी पैसे युनूस नदाफ या नातेवाईकाच्या घरातून चोरून आणल्याचे सांगितले. त्यानंतर सुभानअल्ला नदाफ आणि त्याची मोबीना नदाफ या दोघांना अटक करत त्यांच्याकडील 3 लाख 85 हजार रोकड आणि 1 लाख 32 किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तर मोबीना नदाफ हिने चोरीच्या पैशातून एक लाख 32 हजार किमतीचे सोन्याचे दागिने खरेदी केल्याचे कबुली दिल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून देण्यात आली आहे.