सांगली - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारती हॉस्पिटल प्रशासनाकडून हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या नर्स आणि ब्रदर यांची काळजी घेण्यात येत नसल्याचा आरोप करत विविध मागण्यांसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले आहे. हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या कोरोना सेंटरमध्ये काम करणाऱ्या नर्स आणि ब्रदर यांच्याकडून अतिरिक्त तास ड्यूटी करून घेतली जात आहे. या दरम्यान मॅनेजमेंटकडून नाहक त्रास दिला जात आहे. तसेच कोरोनाच्या स्थितीमध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये राहण्याची सोय करण्याची मागणी आहे. परंतु कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत नाही.
त्याच बरोबर कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याकडून उपचाराचे पैसे घेण्यात येत आहेत, असे आरोप करत हॉस्पिटलमध्ये काम कोरोना सेंटर मध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व नर्स आणि ब्रदर यांनी एकत्रित येत भारती हॉस्पिटल समोर जोरदार निदर्शने केली आहेत. तसेच या काळात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगार वाढवून कोरोना स्थितीत काम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची काळजी घ्यावी,अशी मागणी करण्यात आली आहे. हॉस्पिटल समोर सांगली -मिरज रोडवर येऊन यावेळी भरती हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.