सांगली - होलार समाजाला एसटीमध्ये आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये समस्त होलार समाजाच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले आहे. वाजंत्री वाजवून आणि मोफत बूट पॉलिश करत होलार समाजाने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धऱणे आंदोलन केले आहे.
यावेळी समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पारंपारिक व्यवसाय असणारे डफ, सनई, वाजंत्री वाजवून तसेच बूट पॉलिश करून हे आंदोलन करण्यात आले. होलार समाज समन्वय समितीचे राजराम ऐवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे. तसेच लोहार समाजाच्या वतीने उत्तरप्रदेशच्या हाथरस येथे घटलेल्या घटनेचा निषेधही नोंदवण्यात आला. त्याच बरोबर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अन्यथा यापुढील काळात होलार समाज तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल,असा इशाराही यावेळी होलार समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
हेही वाचा - शासकीय धान्य गोदामावर चोरट्यांचा डल्ला , 1850 रुपयांचे धान्य लंपास