सांगली - तासगाव तालुक्यातील येरळा नदीचे प्रदूषण ( Yerla river pollution ) रोखण्यासाठी तुरची गावाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. वर्षांनू-वर्षांपासून अंत्यविधीनंतर नदीपात्रात अस्थी विसर्जन करण्याची परंपरा बंद ( The tradition of burying bones in the riverbed is stopped ) करण्याचा ठराव करण्यात आला आहे. यापुढे नदीपात्रामध्ये अस्थि विसर्जन ( prevent pollution of Yerala rive ) न करता सदर रक्षा झाडे लावण्यासाठी वापरण्याचा निर्णय सर्व गावाने एकमताने घेतला आहे.
अस्थी विसर्जन बंद - हिंदू संस्कृतीमध्ये मृत्यू पश्चात व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून अंत्यविधीनंतर नदीमध्ये सदर व्यक्तीच्या अस्थी विसर्जन करण्याची श्रद्धा आहे. वर्षानुवर्षांपासून नदी मध्ये अस्थी अर्थात रक्षा विसर्जन आज ही केली जाते. मात्र तासगाव तालुक्यातल्या तुरची गावाने वर्षानुवर्षांपासून सुरू असलेली, या परंपरेला छेद देण्याचा निर्णय घेतला आहे. तासगाव तालुक्यातल्या तुरची गावातून येरळा नदी वाहते. या गावात देखील नदीच्या शेजारी स्मशानभूमी आहे. अंत्यविधी झाल्यानंतर प्रत्येक जण आपल्या नातेवाईकाची अस्थी ही नदीपात्रातच विसर्जित करतो. शेकडो वर्षांपासून ही परंपरा कायम आहेत,मात्र आता तुरची गावाने या परंपरेला छेद दिला आहे.गावातून वाहणारया येरळा नदीचे प्रदूषण थांबवण्यासाठी गावाने यापुढे नदीपात्रामध्ये अस्थी विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रामपंचायत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला आहे.
नदी प्रदूषण रोखण्यासाठी ठराव - गावातील प्रत्येकाने आपल्या नातेवाईकांची अस्थी आपआपल्या शेतात किंवा आपल्या जागेमध्ये मातीत पुरून त्यावर झाड लावायचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे. याशिवाय नदीच्या पात्रामध्ये यापुढे मृत जनावर, कचरा देखील न टाकण्याचा निर्णय घेतला आहे. नदीचे प्रदूषण टाळण्याबरोबर पर्यावरण संवर्धनासाठी गव्हाणे एकत्र येत हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर तुरची गावाने घेतलेल्या निर्णयाचं केरळा नदीकाठची गाव देखील स्वागत करते. अशाच पद्धतीने नदी प्रदूषण रोखण्यासाठी ठराव करतील, अशी अपेक्षाही गावचे सरपंच विकास डावरे यांनी व्यक्त केला आहे.