सांगली - मिरज तालुक्यातील बेडग याठिकाणी छापा टाकत 60 हजारांचा सुंगधी तंबाखू व गुटखाचा साठा जप्त करण्यात आला आहे. मिरज ग्रामीण पोलिसांनीही कारवाई केली आहे. कर्नाटक राज्याच्या सीमेवर हा भाग असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुटख्याची तस्करी आणि विक्री जोमात सुरू आहे, याकडे अन्न व औषध प्रशासनाकडून मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची चर्चा आहे.
अवैध गुटख्याची सरार्स विक्री !
मिरज तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध गुटखा आणि सुगंधी तंबाखूची सरार्सपणे विक्री सुरू आहे. याविरोधात मिरज पोलिसांनी धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मिरज ग्रामीण पोलिसांच्याकडून तालुक्यातील कर्नाटक सीमेवरील भागात छापे टाकण्यात येत आहेत. मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी बेडग याठिकाणी एका दुकानावर छापा टाकत सुगंधी तंबाखू आणि गुटख्याचा साठा जप्त केला.मारुती उद्योग समूह या दुकानावर टाकण्यात आलेल्या या छाप्यात एकूण 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी मारुती माळी यादुकान मालकावर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुटख्याचे कर्नाटक कनेक्शन...
मिरज तालुक्याच्या शेजारी कर्नाटक राज्य आहे, आणि तेथून मोठ्या प्रमाणात हा गुटखा तालुक्या बरोबर जिल्ह्यात दाखल होतो, तसेच याठिकाणाहून विक्री आणि तस्करी करण्यात येते. दोन दिवसांपूर्वी म्हैसाळ नजीकच्या विजयनगर येथील सन्मुख यांच्या मालकीच्य गोदमावर छापा टाकून 66 हजार रुपयांचा सुगंधी तंबाखू साठा जप्त केला होता. हा सर्व गुटखा कर्नाटक मधून आल्याचे समोर आले होते. बेडग येथील कारवाई मध्ये सापडलेला गुटखाही कर्नाटक मधून चोरट्या मार्गाने आणल्याचे समोर आले आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष !
पोलिसांकडून गेल्या तीन ते चार महिन्यातील ही तिसरी कारवाई आहे, पण मोठ्या प्रमाणात अद्यापही जिल्ह्यात सर्रास गुटखा आणि सुगंधी तंबाखू विक्री व तस्करी सुरू आहे. मात्र या गुटखा आणि सुगंधी तंबाखू विरोधात कारवाईची प्रमुख जवाबदारी असणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाकडून सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची चर्चा सुरू आहे.
मिरज तालुक्यात अवैध गुटख्याची विक्री, छापेमारीत 60 हजारांचा मुद्देमाल जप्त - मिरज पोलीस कारवाई
मिरज तालुक्यात कर्नाटकातून अवैधरित्या गुटखा तस्करी केली जाते. या अवैध गुटखा तस्करांवर कारवाई करत मिरज पोलिसांनी छापेमारी केली. यामध्ये ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.