ETV Bharat / state

सांगली जिल्हा ग्रामपंचायत क्षेत्र वगळून २२ ते ३० जुलैपर्यंत लॉकडाऊन - eight days lockdown in Sangli news

जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता 22 जुलै रात्री 10 पासून 30 जुलै रात्री 10 पर्यंत आठ दिवसांसाठी जिल्हा पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.

सांगली जिल्ह्यात आठ दिवसांचे लॉकडाऊन
सांगली जिल्ह्यात आठ दिवसांचे लॉकडाऊन
author img

By

Published : Jul 20, 2020, 4:33 PM IST

सांगली : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. 22 जुलैपासून 30 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात आल्याची घोषणा पालकमंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. विशेषतः सांगली महापालिका क्षेत्रामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली आहे. जिल्ह्यातील वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा लॉकडॉऊन करण्याबाबत प्रशासनाचा विचार सुरू होता. याबाबत आज जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाची बैठक पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

22 जुलै रात्री 10 पासून 30 जुलै रात्री 10 पर्यंत आठ दिवसांसाठी जिल्हा पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. हा लॉकडाऊन महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती यांच्या पुरता लागू राहणार आहे. मात्र इतर गावांनी जनता कर्फ्यु जसा पळाला तसे पाळावे, असे पालकमंत्री म्हणाले. लॉकडाऊन करण्याचा मानस नव्हता, मात्र जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ती मर्यादित आणण्याकरता तसेच सांगली जिल्ह्याशेजारी असणारे कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर जिल्हे सध्या लॉकडाऊन करण्यात आले आहेत. त्यामुळे इतर गोष्टींचा विचार करून लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याला जनतेने प्रतिसाद द्यावा असे आवाहन करत, या लॉकडाऊनमध्ये काय सुरू राहील याबाबत लवकरच जिल्हाधिकारी आदेश जारी करतील, असे पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

या बैठकीला कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.