सातारा/सांगली - सातारा, सांगली, कोल्हापूर येथे जवळपास दहा दिवसांपासून महापूर आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात अनेक अडचणी येत आहेत. मात्र, तरीही शेवटच्या नागरिकाला सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे ध्येय समोर ठेवून पूरग्रस्तांसाठी दोन जण देवदूत म्हणून समोर आले आहेत.
गजानन अदमाने आणि रवी पाटील अशी या दोन देवदुतांची नावे आहेत. खुद्द यांच्याच नजरेतून पाहुया सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ. येथे बोट उलटून 17 जण दगावले होते. दे दोन देवदूत त्या घटनेचे प्रत्यक्षदर्शी असून, बोटीतील नागरिकांना वाचवण्यासाठी ते धावून गेले होते. हे भीषण वास्तव जाणून घेतले आहे, आमचे सातारचे प्रतिनिधी महेश जाधव यांनी.