ETV Bharat / state

पावसाने दुसऱ्यांदा द्राक्षबागेवर फिरवलं पाणी..शेतकऱ्याने द्राक्षवेलींवर चालवला कोयता

सलग दुसऱ्या वर्षीही अतिवृष्टीमुळे द्राक्ष बाग वाया गेली. त्यामुळे खानापूरच्या आळसंदमधील द्राक्षबाग शेतकऱ्याच्या पदरी निराशा आली. चार ते पाच लाख रुपये उत्पन्न त्यांना यंदा अपेक्षित होतं, मात्र या सर्वावर पावसानं पाणी फिरलं आहे. त्यामुळे या शेतकऱ्यासमोर बाग तोडण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही आणि जड अंतकरणातून त्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या बागेवर कोयता चालवला.

grape crop Damage
द्राक्षवेलींवर चालवला कोयता
author img

By

Published : Oct 30, 2020, 9:20 PM IST

Updated : Oct 30, 2020, 9:27 PM IST

सांगली - अतिवृष्टीमुळे हाता-तोंडाशी आलेली द्राक्षबाग वाया गेल्याने एका शेतकऱ्यांनी स्वतःच्या हाताने द्राक्षबाग जमीनदोस्त केली आहे. एक एकरावरील बाग पावसाने वाया गेल्याने खानापूरच्या आळसंदमधील द्राक्षबाग शेतकऱ्याने हे पाऊल उचलले आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या बागेवर कोयता चालवताना शेतकऱ्याला अश्रु अनावर झाले होते.

शेतकऱ्याने द्राक्षवेलींवर चालवला कोयता
अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झाले आहे. याचा सर्वाधिक फटका हा द्राक्षबागांना बसला आहे. ऐन बहारात आलेली द्राक्षबाग परतीच्या पावसाने पूर्ण वाया गेली आहे, तर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहिल्याने रोगांचा प्रादुर्भाव होऊन बाग वाया गेल्या आहेत. खानापूरच्या आळसंद येथील शेतकरी अंकुश जाधव यांची एक एकर द्राक्ष बाग सुध्दा परतीच्या पावसाच्या विळख्यात सापडली आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्या या बागेमध्ये आलेला फुलोरा, मणीघड हे गळून पडला, त्याचबरोबर बागेमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून राहिले आणि याचा परिणाम त्यांच्या बागेत यंदा द्राक्ष उत्पादन होऊ शकले नाही.सलग दुसऱ्यांदा द्राक्षबाग गेली वाया..गेल्या वर्षीही अवकाळी पावसाचा फटका जाधव यांच्या बागेला बसला होता आणि त्यावेळी ही बागही वाया गेली होती.पण यातून ही सावरत जाधव यांनी सुमारे चार ते पाच लाख रुपये यंदाही भोसले यांनी बाग लागवडीमध्ये खर्च केले होते, व्याजाने कर्ज घेऊन जधाव यांनी ही द्राक्ष बाग फुलवली होती आणि सलग दुसऱ्या वर्षीही अतिवृष्टीमुळे बाग वाया गेली. त्यामुळे त्यांच्या पदरी निराशा आली. चार ते पाच लाख रुपये उत्पन्न त्यांना यंदा अपेक्षित होतं, मात्र या सर्वावर पावसाचं पाणी फिरलं आहे. जाधव यांच्यासमोर बाग तोडण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही आणि जड अंतकरणातून त्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे फुलवलेली द्राक्ष बाग स्वतःच्या हाताने जमीनदोस्त केली. कोयत्याने बागेवर घाव घालताना त्यांच्या डोळ्यात अश्रूही आले.शासनाच्या मदतीची अपेक्षा..सलग दुसऱ्यांदा नुकसान झाल्याने शासनाकडून मदतीच्या अपेक्षा अंकुश जाधव यांनी व्यक्त केली आहे. किमान 50 टक्के शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी जाधव यांनी केली आहे. जाधव यांच्या प्रमाणेच सांगली जिल्ह्यातल्या अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था आहे, त्यामुळे राज्य शासनाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी भरीव मदती करावी, अशी मागणी शेतकरी करत आहे.

Last Updated : Oct 30, 2020, 9:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.