ETV Bharat / state

Gopichand Padalkar : राष्ट्रवादीच्या नाकावर टिच्चून पडळकरांनी अहिल्यादेवींच्या स्मारकाचे केले ड्रोनद्वारे उद्घाटन..

सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकावरून राजकीय वातावरण तापले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन ठरले असताना भाजप नेते गोपीचंद पाडळकरांनी मेंढपाळांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे जाहीर केले ( Ahilyabai Holkar memorial inauguration ) होते. प्रचंड पोलीस बंदोबस्त लावून पडळकर यांचा ताफा रोखण्यात आला. मात्र त्यांनी गनिमी कावा करत ड्रोनद्वारे अहिल्यादेवींच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करून स्मारकाचे उद्घाटन केल्याचे जाहीर ( Gopichand Padalkar Inaugurated Ahilyadevi Holkar Memorial ) केले.

राष्ट्रवादीच्या नाकावर टिच्चून पडळकरांनी अहिल्यादेवींच्या स्मारकाचे केले ड्रोनद्वारे उद्घाटन..

author img

By

Published : Mar 27, 2022, 7:44 PM IST

सांगली - संचारबंदी, प्रचंड पोलीस फौजफाटा याला न जुमानता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे उद्घाटन भाजपाच्यावतीने करण्यात आले ( Ahilyabai Holkar memorial inauguration ) आहे. थेट ड्रोनद्वारे अहिल्यादेवी होळकर स्मारकावर पुष्पवृष्टी करत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्मारकाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले ( Gopichand Padalkar Inaugurated Ahilyadevi Holkar Memorial ) आहे. त्यामुळे सकाळपासून सांगली शहरात निर्माण झालेला तणाव निवळला आहे.

स्मारक उदघाटवरून राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा : सांगली, मिरज आणि कुपवड शहर महानगरपालिकेच्यावतीने अडीच कोटी रुपये खर्चून, सांगलीमध्ये पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक बांधण्यात आले आहे. या स्मारकाच्या उद्घाटनावरून राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरू झाला होता. महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2 एप्रिल रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मात्र, हा कार्यक्रम सर्वपक्षीय नसल्याचा आरोप करत भाजपाने याला विरोध दर्शवला . 27 मार्च रोजी धनगर समाजातील मेंढपाळा बांधवांच्या हस्ते उद्घाटन करणार असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केले होते.

राष्ट्रवादीच्या नाकावर टिच्चून पडळकरांनी अहिल्यादेवींच्या स्मारकाचे केले ड्रोनद्वारे उद्घाटन..

स्मारक परिसरात संचारबंदी आणि तगडा बंदोबस्त : यामुळे मोठा वाद निर्माण होऊन, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजपा असा संघर्ष निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून 25 मार्च पासून 2 एप्रिलपर्यंत अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसरामध्ये 144 कलम लागू करत संचारबंदीत जाहीर करण्यात आली. तर रविवारी 27 मार्च रोजी उद्घाटन होणारच असा निर्धार आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला होता. त्या पार्श्वभूमीवर आज रविवारी सकाळपासून प्रचंड पोलिस बंदोबस्त स्मारकाच्या परिसरामध्ये तैनात करण्यात आला होता. त्याचबरोबर स्मारकाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करत, संपूर्ण परिसर पत्र्याचे बॅरिकेट लावून सील करण्यात आला होता. स्मारकाच्या ठिकाणी कोणीही येऊ नये, यादृष्टीने प्रचंड घेराबंदी पोलीस प्रशासनाच्यावतीने अहिल्यादेवी स्मारकाच्या परिसराला करण्यात आली होती. जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली होती. त्यामुळे सांगली शहरांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

प्रचंड जनसमुदाय घेऊन स्मारकाकड़े आगेकूच: दुपारनंतर आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, नगरसेवकांनी हजारो धनगर समाज बांधवांनी एकत्र येऊन उद्घाटनासाठी जण्याची तयारी सुरू केली. दुपारी 3 वाजता आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड जनसमुदाय मोटरसायकल रॅलीद्वारे विजयनगर परिसरातील स्मारकाच्या दिशेने निघाला. त्यानंतर कुपवाड रस्त्यावरून स्मारकाकडे भारत सूतगिरणीजवळ पोलिसांनी संपूर्ण जनसमुदायाला रोखून धरलं. त्यामुळे आमदार पडळकरांसह सर्वांनी रस्त्यावर ठिय्या मारला. मात्र, काही आक्रमक महिलांनी पोलिसांचे कडे तोडून स्मारकाच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली.

प्रशासनाला चकवा देत, ड्रोनने स्मारकाचे उद्घाटना : एका बाजुला हा सर्व गदारोळ सुरू असताना आणि संपूर्ण पोलीस प्रशासनाचं लक्ष आमदार गोपीचंद पडळकर, आमदार आमदार घाडगे यांच्या बरोबर असणाऱ्या जनसमुदायाकडे लागून राहिले होते. दुसर्‍या बाजूला मात्र आमदार गोपीचंद पडळकर यांनी गनिमी काव्याने अहिल्यादेवी स्मारकावर ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी करत स्मारकाचे उदघाटन केले आहे.

यापुढेही राष्ट्रवादीला तोंडावर पाडू : आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, डिजिटल भारतामध्ये मेंढपाळांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकावर ड्रोनद्वारे गुलाब पुष्पवृष्टी करून आम्ही स्मारकाचं उद्घाटन केल आहे. ज्यावेळी लोकभावना तीव्र असते आणि लोकांनी एखाद्या गोष्टीत ठाम राहायच ठरवलेलं असतं, त्यावेळी पोलीस लावून काही फरक पडत नाही. ज्यांचा हेतू स्पष्ट आणि स्वच्छ असतो, त्यांना यश मिळतं. लोकांची भावना होती मेंढपाळ यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर स्मारकाचं उद्घाटन व्हावे. ते झालेलं आहे. तसेच यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाकावर टिच्चून आम्ही काम करू. त्यांनी कितीही सत्तेचा गैरवापर केला, तरी त्यांना तोंडावर पडावे लागेल, असा इशारा आमदार पडळकर यांनी दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.