ETV Bharat / state

कपडे बदलून फेसबुक लाईव्ह करून काही होणार नाही - गोपीचंद पडळकर

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील वाढत्या कोरोना स्थितीबाबत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. यावरून भाजपा प्रवक्ते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

गोपीचंद पडळकर
गोपीचंद पडळकर
author img

By

Published : Apr 3, 2021, 2:27 PM IST

Updated : Apr 3, 2021, 3:23 PM IST

सांगली - कपडे बदलून फेसबुक लाईव्ह करून काही होणार नाही. खुर्ची सोडून रस्त्यावर उतरावे, अशी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर केली आहे. लोकांच्या मनात भीती आणि दहशत निर्माण करायचे सरकारने बंद करत आपले पाप जनतेच्या माथी मारून जनतेला जबाबदार ठरवायचे बंद करावे, असा इशाराही पडळकर यांनी दिला आहे.

गोपीचंद पडळकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका

जनतेच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रकार

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील वाढत्या कोरोना स्थितीबाबत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. यावरून भाजपा प्रवक्ते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फेसबुक लाईव्हवर कश्यासाठी आले, त्यांनी त्यामध्ये वारंवार बेरोजगारी आणि लॉकडाऊन याचा उल्लेख केला. ही दुर्दैवी बाब असून, यामुळे जनतेच्या मनामध्ये काय संदेश जाणार आहे ? लोकांच्या मनामध्ये प्रचंड भीती आणि दहशत निर्माण बंद करण्याचा हा प्रकार असल्याचे पडळकर म्हणाले.

हेही वाचा - मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी सचिन वाझेचा लोकलने प्रवास ?

जनतेला जबाबदार ठरवणे बंद करा

लोकांच्या जीवन - मरणाचा प्रश्न उभा राहिला आहे आणि सरकारने लॉकडाऊनचा खेळ लावला आहे. एका वर्षात सरकारने काय केले? सरकारला कोरोनाचा प्रसार रोखता आला नाही, हे आता जनतेला कळले आहे. कोरोनावर लॉकडाऊन हा पर्याय नाही. लॉकडाऊनशिवाय कोरोना नियंत्रणाता आणता येतो. पण हे सरकार प्रत्येक वेळी जनतेला गृहीत धरून मनमानी निर्णय घेऊन जनतेला जबाबदार ठरवत आपले पाप जनतेच्या माथी मारत आहे. हे सरकारने बंद करावे आणि मुख्यमंत्री यांनी फेसबुक लाईव्हमध्ये कपडे बदलून येण्यापेक्षा खुर्ची सोडून रस्त्यावर यायला पाहिजे, असे आवाहन पडळकर यांनी केले आहे.

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र ?

पश्चिम बंगलाच्या निवडणूकीवरून ठाकरे सरकारने ममता दीदी यांचे कौतुक करण्यापेक्षा राज्यात काय दिवे लावल्यात ते पहावे. आज देशात नव्हे तर जगात कोरोनामध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रच्या जनतेने या सरकारला महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे. हे विचारले पाहिजे.असे मत पडळकर यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा - नजरचूक! हा तर 'धक्कादायक विनोद' म्हणावा लागेल

Last Updated : Apr 3, 2021, 3:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.