ETV Bharat / state

परदेशी कंपनीकडून द्राक्ष निर्यातदार कंपनीला गंडा, संचालकाकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल - सांगली द्राक्षे उत्पादक शेतकरी

जिल्ह्यातल्या द्राक्ष बागायत शेतकऱ्यांना तब्बल तीन कोटी रुपयांना दुबई स्थित एका कंपनीकडून गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मिरजेतील द्राक्ष एक्सपोर्ट कंपनीच्या संचालकाने दुबई येथील 'जान जबेल अल-नजर फूडस्टफ' कंपनीच्या विरोधात मिरज येथील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात या फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली आहे.

परदेशी कंपनीकडून द्राक्ष निर्यातदार कंपनीला घातला गंडा, फसवणुकीचा गुन्हा दाखल

author img

By

Published : Jun 2, 2021, 1:44 AM IST

सांगली - जिल्ह्यातल्या द्राक्ष बागायत शेतकऱ्यांना तब्बल तीन कोटी रुपयांना दुबईस्थित एका कंपनीकडून गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मिरजेतील द्राक्ष एक्सपोर्ट कंपनीच्या संचालकाने दुबई येथील 'जान जबेल अल-नजर फूडस्टफ' कंपनीच्या विरोधात मिरज येथील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात या फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली आहे.

परदेशी कंपनीकडून द्राक्ष निर्यातदार कंपनीला घातला गंडा, फसवणुकीचा गुन्हा दाखल

3 कोटी 30 लाखांचा द्राक्ष पाठवली दुबईला

सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात परदेशात द्राक्ष निर्यात करण्यात येते. यंदाच्या हंगामातही अनेक शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या एक्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून द्राक्ष निर्यात केली आहे. मिरजेतील पांडुरंग जगताप यांच्या 'ऑल एशिया इम्पोर्ट-एक्सपोर्ट' या कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यातील जवळपास 22 द्राक्षबाग शेतकऱ्यांचे सुमारे 180 टन द्राक्ष एक्सपोर्ट केली आहेत. पांडुरंग जगताप यांनी आपल्या कंपनीच्या माध्यमातून दुबईस्थित 'जान जबेल अल-नजर फूड स्टफट्रेडिंग एलएलसी' या कंपनीला हे द्राक्ष पाठवली. 18 फेब्रुवारी पासून 4 एप्रिल दरम्यान जगताप यांनी 15 कंटेनरच्या माध्यमातून 3 कोटी 30 लाख किंमतींची द्राक्ष एक्सपोर्ट केली आहेत.

ऑनलाइन खरेदीच्या फंडयातून कोटींचा गंडा

द्राक्ष देवाण-घेवाणचा सर्व प्रकार जगताप आणि दुबई-स्थित कंपनीमध्ये ऑनलाइन पद्धतीने झाला होता.'जान जबेल अल-नजर फूड स्टफट्रेडिंग कंपनीचे आनंद देसाई आणि सुबीत या दोघांनी जगताप यांच्या वेबसाइटच्या माध्यमातून पहिल्यांदा संपर्क साधला, त्यानंतर जगताप आणि आनंद देसाई व सुबीत यांच्यामध्ये द्राक्ष एक्सपोर्ट करण्याचा व्यवहार झाला. सुरवातीला ऍड ऍडव्हान्स म्हणून 30 टक्के, त्यानंतर 3 आठवडयात 70 टक्के रक्कम देण्याबाबत करार झाला होता. यानंतर जगताप यांनी आपल्या कंपनीच्या माध्यमातून दुबईच्या ठिकाणी फेब्रुवारी 2021 ते एप्रिल 2021 दरम्यान 180 टन इतकी द्राक्ष पाठवली. यानंतर कंपनीकडून पैसे देण्यास मात्र वारंवार टाळाटाळ करण्यात येत होते. जगताप यांना वेळो-वेळी तारखेचा वायदा देण्यात आला. मात्र, जगताप यांनी वारंवार तगादा लावल्याने केवळ 25 लाख रुपये इतकी रक्कम टप्प्या-टप्प्याने देण्यात आली. पण 3 कोटी रक्कम आद्यप येणे बाकी असल्याने, जगताप हे आनंद देसाई व सुबीत यांच्याशी संपर्क ठेवून शेतकऱ्यांना पैस लवकर देणे गरजेचे असल्याचे संगितले, पण 12 एप्रिल नंतर कंपनीच्या सर्व संचालकांचे मोबाईल बंद झाले. त्यानंतर जगताप यांचा 'जान जबेल अल-नजर' कंपनीशी असणारा सर्व संपर्क तुटला.

दुबईतल्या कंपनी विरोधात फसवणुकीची तक्रार

या प्रकारानंतर जगताप यांनी दुबईस्थित असणाऱ्या या कंपनीशी संपर्क होईल व आपले पैसे मिळतील या अपेक्षेने कंपनीच्या संचालकांच्या शोध घेण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. मात्र, कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ शकला नाही. शेवटी आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर जगताप यांनी मंगळवारी मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात या 'जान जबेल अल-नजर' कंपनीच्या विरोधात आपली तीन कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.