ETV Bharat / state

कोरोनाचे थैमान; 15 दिवसात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

शिराळ तालुक्यातील शिरशी येथील एकाच कुटुंबातील वडील आई आणि 30 वर्षीय मुलाच अवघ्या 13 तासात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना ताजी असताना, कडेगाव तालुक्यातील तोंडोली येथील एकाच कुटुंबातील आई-वडील आणि दोन मोठ्या मुलांचा अवघ्या 15 दिवसात एकापाठोपाठ मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

15 दिवसात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

author img

By

Published : May 21, 2021, 10:09 AM IST

सांगली - अवघ्या 15 दिवसात एकाच कुटुंबातील चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कडेगाव तालुक्यातील तांडोलीत घडली आहे. आई-वडील आणि दोन मोठ्या मुलांचा एका पाठोपाठ कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. नुकतेच शिराळा येथील शिरशी येथील एक कुटंब अवघ्या 13 तासात निर्मनुष्य झाल्याची घटना ताजी असताना या घटनेनेमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

आणखी एक कुटुंब कोरोनाने संपले ....

कोरोनाचा प्रादुर्भाव सांगली जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात आहे. रोज हजारहुन रुग्ण आढळत आहेत. वेळेत उपचार आणि तोकडी आरोग्य यंत्रणा यामुळे मृत्यू होत आहेत. पण आता कोरोनामुळे अख्खी कुटुंब मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना सांगली जिल्ह्यात घडत आहेत. शिराळ तालुक्यातील शिरशी येथील एकाच कुटुंबातील वडील आई आणि 30 वर्षीय मुलाच अवघ्या 13 तासात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना ताजी असताना, कडेगाव तालुक्यातील तोंडोली येथील एकाच कुटुंबातील आई-वडील आणि दोन मोठ्या मुलांचा अवघ्या 15 दिवसात एकापाठोपाठ मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

वडील, आई, नंतर सख्ख्या भावांचा मृत्यू...

तोंडोली येथील अनिल सुखदेव मोहिते, (वय 47) त्यांचे वडील सुखदेव मोहिते (80), आई वैजयंती सुखदेव मोहिते (वय 75) आणि अशोक सुखदेव मोहिते (वय 58) या एकाच कुटुंबातील चौघांचा कोरोनामुळे एकापाठोपाठ एक असा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अनिल हे मुंबई याठिकाणी रंगकाम करत होते तर अशोक हे शेती संभाळत होते.

एकापाठोपाठ चौघांचा मृत्यू....

मोहिते कुटुंबात पहिल्यांदा वैजयंती मोहिते यांना कोरोना लागण झाल्याचे समोर आले. त्यांनतर २४ एप्रिल रोजी त्यांना कराड येथील रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान अनिल यांचे वडील सुखदेव मोहिते यांनाही कोरोनाची लागण झाली. पण त्यांना उपचारासाठी कुठेच बेड मिळाला नाही ,त्यामुळे 6 मे रोजी त्यांचा घरीच मृत्यू झाला.दरम्यान अनिल यांचे मोठे भाऊ अशोक मोहिते यांनाही कोरोनाची लागण झाली.त्यानंतर त्यांना कडेगाव येथील कोविड सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू आसताना 15 मे रोजी त्यांचाही उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

15 दिवसात कुटुंब बनले पोरके...

तर मोहिते कुटुंबात घडणाऱ्या सर्व गोष्टींना सामोरे जाणारे आणि कुटुंबाला कोरोना झालेल्या परिस्थिती धावाधाव करणारे अनिल मोहिते यांनाही कोरोना लागण झाल्याची बाब समोर आली होती. त्यांना विटा येथील कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना 16 मे रोजी त्यांचाही कोरोनामूळे मृत्यू झाला. या चौघांच्या पश्चात आता अनिल व अशोक मोहिते यांच्या पत्नी ,6 मुले असा परिवार आहे. मात्र चौघांच्या निधनाने मोहिते कुटुंबाचे सर्व छत्र हरपले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.